इथे आढळून आले 1 लाख वर्ष जुने पायांचे ठसे, कसे दिसत होते तेव्हाचे लोक?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:13 AM2024-02-13T09:13:11+5:302024-02-13T09:15:23+5:30

हे ठसे 1 लाख वर्ष जुने मानले जात आहेत. असंही सांगण्यात आलं की, हे पायांचे ठसे पाच व्यक्तींचे आहेत.

One lakh year old human footprints found by scientists in Morocco | इथे आढळून आले 1 लाख वर्ष जुने पायांचे ठसे, कसे दिसत होते तेव्हाचे लोक?

इथे आढळून आले 1 लाख वर्ष जुने पायांचे ठसे, कसे दिसत होते तेव्हाचे लोक?

प्राचीन वस्तू किंवा खूणांच्या माध्यमातून आपल्या दिसतं की, त्यावेळी मनुष्य कसे दिसत होते. ते कसं जीवन जगत होते. असाच एक शोध मोरक्कोमध्ये लागला आहे. इथे एक लाख वर्ष जुने पायांचे ठसे दिसून आले आहेत. ज्यावरून समजतं की, मनुष्य त्यावेळी कसे दिसत असतील.

जानेवारीमध्ये मोरक्को, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या वैज्ञानिकांच्या एका टीमने हा शोध सायन्स जनरल नेचरमध्ये प्रकाशित केला. यात सांगण्यात आलं की, मानवांच्या पायांचे चांगल्याप्रकारे संरक्षित काही ठसे सापडले आहेत.

हे ठसे 1 लाख वर्ष जुने मानले जात आहेत. असंही सांगण्यात आलं की, हे पायांचे ठसे पाच व्यक्तींचे आहेत. हे मोरक्कोतील उत्तर भागाच्या एका शहराच्या समुद्र तटावर आढळून आले आहेत.

जून 2022 मध्ये पुरातत्ववादी माउन्सेफ सेड्राती याना लाराचे शहरामध्ये वेगवेगळ्या आकाराचे पायांचे ठसे आढळून आले होते. ते म्हणाले की, 'आम्हाला पायांचे पहिले ठसे आढळून आले तेव्हा आणखी मिळतील असं वाटलं नव्हतं. पण नंतर एकापाठी एक पायांचे ठसे सापडत गेले'.

हे पायांचे ठसे पाचा मनुष्यांच्या समूहाने बनवले असतील. जे या रस्त्याने पाण्याकडे चालत गेले होते. हे उत्तर आफ्रिका आणि दक्षिण भूमध्य सागरात सापडलेले पहिले प्रारंभिक मानवी ठसे आहेत. या पाच लोकांमध्ये वेगवेगळ्या वयाचे वयस्क आणि मुले असतील.

हे समजू शकलं नाही की, हे लोक इथे का आले असतील. ते समुद्रात काही पकडण्यासाठी आले असतील किंवा ते इथे फिरत फिरत आले? हे अजून समजू शकलेलं नाही. 

वैज्ञानिकांनी ड्रोनच्या मदतीने घेतलेल्या 461 फोटोंना प्रिंट केले. आता आधुनिक टेक्निकच्या माध्यमातून या पायांच्या ठस्यांचे आकार आणि लोकांच्या वयाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: One lakh year old human footprints found by scientists in Morocco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.