ज्या पेंटिंगला कचरा समजून फेकणार होती ती निघाली 208 कोटींची, जाणून घ्या खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 09:25 AM2023-11-15T09:25:35+5:302023-11-15T09:26:55+5:30

या पेंटिंगला फ्रांस सरकारने नॅशनल हेरिटेज म्हणून घोषित केलं आहे. आता ही पेंटिंग फ्रांसमधील म्युझिअम Louvre म्युझिअममध्ये ठेवली जाणार आहे.

Old woman planned to throw painting in trash auctions in 25 million dollars | ज्या पेंटिंगला कचरा समजून फेकणार होती ती निघाली 208 कोटींची, जाणून घ्या खासियत!

ज्या पेंटिंगला कचरा समजून फेकणार होती ती निघाली 208 कोटींची, जाणून घ्या खासियत!

एक वयोवृद्ध महिला आपल्या घराची सफाई करत असताना तिला किचनमध्ये एक पेंटिंग मिळाली. पण तिला याचा अजिबात अंदाज नव्हता की, या पेंटिंगची किंमत किती आहे. या पेंटिंगची किंमत 25 मिलियन डॉलर म्हणजे 208 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. या पेंटिंगचं नाव आहे क्रिस्ट मॉक्ड. ही पेंटिंग इटलीतील पेंटर Cimabue यानी बनवली होती. तसेच ही पेंटिंग 13व्या शतकातील असल्याचं सांगण्यात आलं. या पेंटिंगला फ्रांस सरकारने नॅशनल हेरिटेज म्हणून घोषित केलं आहे. आता ही पेंटिंग फ्रांसमधील म्युझिअम Louvre म्युझिअममध्ये ठेवली जाणार आहे.

एका रिपोर्टनुसार, पेंटिंग 2019 मध्ये साफ-सफाई दरम्यान सापडली होती. लिलावातून याला 25 मिलियन डॉलर मिळाले होते. सफाईचं काम जी महिला करत होती ती 90 पेक्षा अधिक वयाची आहे. तिला याचा जराही अंदाज नव्हता की, जी पेंटिंग ती रोज बघत होती तिची किंमत इतकी असेल. ती ही पेंटिंग कचऱ्यात फेकण्याचा विचार करत होती.

पेंटिंग चिलीचे अब्जाधीश अलवारो सेह बेंडेक आणि त्यांची पत्नी एना गुजमॅन अह्नफेल्ट यांनी खाजगी कलेक्शनसाठी खरेदी केली होती. पण जेव्हा फ्रांसच्या सरकारने निर्यातीचं लायसेन्स देण्यास नकार दिला तेव्हा समस्या झाली. म्युझिअमला पेंटिंग आपल्या जवळ ठेवण्यासाठी आवश्यक फंड जमा करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला. 

पेंटर Cimabue यांच्या एका दुसऱ्या पेंटिंगचं नाव Maesta आहे. ही पेंटिंग आधीच म्युझिअममध्ये ठेवली आहे. सध्या या पेंटिंगवर काम केलं जात आहे. ही पेंटिंग आणि 208 कोटीमध्ये लिलाव होणारी पेंटिंग क्रिस्ट मॉक्डला 2025 मध्ये होणाऱ्या एक्झीबिशनमध्ये ठेवलं जाणार आहे. 

Web Title: Old woman planned to throw painting in trash auctions in 25 million dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.