क्या बात! तहानलेल्या कुत्र्याची आजोबांनी भागवली तहान, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:08 IST2020-02-26T14:53:45+5:302020-02-26T15:08:23+5:30
या व्हिडीओवर वेगवेगळ्या सकारात्मक आणि कौतुकाच्या कमेंट्स आल्या आहेत.

क्या बात! तहानलेल्या कुत्र्याची आजोबांनी भागवली तहान, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील...
आपण सध्याच्या जगात वावरत असताना पाहत आहोत की माणुसकी हरवत चालली आहे. असं असताना सुद्धा समाजातील काही घटक असे आहेत. जे समाजाप्रती आपलं कर्तव्य आणि जबाबदारी पूर्ण करत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला माणुसकीचं दर्शन घडून येईल.
सुशांतने या व्हिडीओला कॅप्शन दिला आहे. काहीतरी मिळवण्याची आशा न ठेवता निर्पेक्षवृत्तीने हा वृध्द कुत्र्याची तहान भागवत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या सकारात्मक आणि कौतुकाच्या कमेंट्स आल्या आहेत. ( हे पण वाचा-'ही' महिला मिठी मारून तासाला कमावते ७ हजार रुपये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण)
You have not lived ur day, until you have done something for someone who can never repay you🙏🏼
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 25, 2020
Be compassionate in what you today. pic.twitter.com/SK7zXjCxnc
या व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती चक्क आपल्या हातांनी तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजत आहे. या व्हिडीओला १० हजार व्ह्यूज आणि दीड हजार लाईक्स मिळाले आहेत. ( हे पण वाचा-अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाला व्हाइट हाऊस का म्हणतात?)