विचित्र! कर्नाटकात जन्माला आले दोन तोंडे आणि चार डोळ्यांचे बोकड

By Admin | Updated: May 23, 2017 18:09 IST2017-05-23T18:09:41+5:302017-05-23T18:09:41+5:30

सर्वांचा निर्माता असलेला निसर्ग अनेक वैचित्र्यपूर्ण गोष्टींचे सृजन करत असतो. असाच एक विचित्र प्रकार कर्नाटकमध्ये

Odd In Karnataka, two mouth and four-eyed goat were born | विचित्र! कर्नाटकात जन्माला आले दोन तोंडे आणि चार डोळ्यांचे बोकड

विचित्र! कर्नाटकात जन्माला आले दोन तोंडे आणि चार डोळ्यांचे बोकड

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 23 -  वैचित्र्याने भरलेल्या या जगात दररोज अनेक चित्रविचित्र घटना घडत असतात. सर्वांचा निर्माता असलेला निसर्ग अनेक वैचित्र्यपूर्ण गोष्टींचे सृजन करत असतो. असाच एक विचित्र प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. कर्नाटकमधील नांजेगौडाना डौड्डी नावाच्या गावात चक्क एका बोकडाने दोन तोंडे असलेल्या कोकराला जन्म दिला आहे.  
 
नांजप्पा यांनी पाळलेल्या एक बकरीने या दोन तोंडांच्या कोकराला जन्म दिला आहे. दोन डोकी असलेल्या  चार डोळे आणि दोन नाके आहेत. कान मात्र दोनच आहेत. मात्र शारीरिक व्यंगासह जन्माला येऊनही या कोकराची प्रकृती उत्तम आहे. या विचित्र कोकराला पाहण्यासाठी या शेतकऱ्याच्या गोठ्यात बघ्यांची गर्दी होत आहे. तसेच या कोकराचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.  

Web Title: Odd In Karnataka, two mouth and four-eyed goat were born