शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 1:59 PM

आता एक असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही.

ठळक मुद्देआता एक असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही.जपानमधील शास्त्रज्ञांनी एका असा उपाय शोधला आहे ज्यामुळे आईस्क्रीम लगेच वितळणार नाही. जपानमधील कनाजवा विद्यापीठाच्या रिसर्चने आईस्क्रीम वितळविण्याची क्षमता कमी करण्याचा पर्याय शोधला असल्याचा दावा केला आहे.

टोकीयो, दि. 8- आईस्क्रीम हा सगळ्याच्याच आवडीचा पदार्थ आहे. सगळेच जण आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेतात. पण हे आईस्क्रीम फ्रिजमधून बाहेर काढलं किंवा ते खाण्यासाठी वाटीमध्ये काढलं तर लगेचच वितळायला लागतं. आईस्क्रीम लगेच वितळत म्हणून ते भरभर खावं लागतं. पण आता एक असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही.

जपानमधील शास्त्रज्ञांनी एका असा उपाय शोधला आहे ज्यामुळे आईस्क्रीम लगेच वितळणार नाही. जपानमधील कनाजवा विद्यापीठाच्या रिसर्चने आईस्क्रीम वितळविण्याची क्षमता कमी करण्याचा पर्याय शोधला असल्याचा दावा केला आहे. या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेलं आईस्क्रीम खोलीतील सामान्य तापमानातही विरघळत नाही. द टाइम्समने हे वृत्त दिलं आहे. जपानच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या त्या प्रोडक्टची चाचपणी करण्यासाठी त्यांनी हेअर ड्रायरचा वापर केला. हेअर ड्रायरद्वारे त्यांनी गरम हवा त्यांनी तयार केलेल्या प्रोडक्टसह आईस्क्रीमवर सोडली. गरम हवेचाही त्या आईस्क्रीमवर काहीही परिणाम झाला नाही. मूळ आकारातच ती आईस्क्रीम राहिल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. शास्त्रज्ञांनी स्ट्रॉबेरीतून काढलेल्या पॉलिफॅनॉल द्रवासह इंजेक्शनद्वारे आइस्क्रीम तयार केलं आहे. पाणी आणि तेल वेगळं होऊ न देणं हा पॉलिफॅनिक द्रवाचा गुणधर्म आहे, असं कनाजवा विद्यापिठाचे  प्राध्यापक तोमिहिसा ओता यांनी सांगितलं आहे.

ज्या आईस्क्रीममध्ये हा पदार्थ असेल ते आईस्क्रीन दिर्घ काळापर्यंत त्याच्या मूळ स्वरूपात राहतं, असंही ते म्हणाले आहेत.जपानी शास्त्रज्ञ स्ट्रॉबेरीतून निघणाऱ्या पॉलिफॅनॉलवर प्रयोग करत असताना हा शोध लागला आहे. जपानच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेलं हे आईस्क्रीम एका खोलीतील साधारण तापमानात ठेवलं होतं पण त्या तापमानाचा आईस्क्रीमवर काहीही परिणाम झाला नाही. तीन तास ते तसंच होतं. या संदर्भातील एक व्हिडीओही जारी करण्यात आला आहे.