नो इश्श्....! लंडनच्या ट्रेनमध्ये लोक आले अंडरवेअरवर, महिलाही; पाहणाऱ्यांच्या मनातही लज्जा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:43 IST2025-01-15T19:43:28+5:302025-01-15T19:43:46+5:30

लंडनमध्ये 'नो ट्राउजर ट्यूब राइड' इव्हेंट दरवर्षी साजरा केला जातो. कडाक्याच्या थंडीत हा इव्हेंट एक रोमांचकारी असतो.

No Trousers Tube Day No Ishsh....! People came in underwear on a London train, including women; even the onlookers have no shame | नो इश्श्....! लंडनच्या ट्रेनमध्ये लोक आले अंडरवेअरवर, महिलाही; पाहणाऱ्यांच्या मनातही लज्जा नाही

नो इश्श्....! लंडनच्या ट्रेनमध्ये लोक आले अंडरवेअरवर, महिलाही; पाहणाऱ्यांच्या मनातही लज्जा नाही

वेगवेगळे शॉर्ट, विचित्र ड्रेस घालून फिरणारी नटी भारतीयांसाठी काही नवीन नाही. परंतू, लंडनच्या रेल्वेस्थानकांवर एक विचित्रच मोहिम दिसली. प्रवासी चक्क फुल पँट न घालता अंडरवेअरवर आले होते. यात महिलाही होत्या. आता या प्रवाशांना एकमेकांना पाहून मनात लज्जाही उत्पन्न झाली नाही. कारण सगळेच अंडरवेअरमध्ये होते. 

लंडनमध्ये 'नो ट्राउजर ट्यूब राइड' इव्हेंट दरवर्षी साजरा केला जातो. कडाक्याच्या थंडीत हा इव्हेंट एक रोमांचकारी असतो. थंडीत उघड्या पायांनी प्रवास करायचा हा ट्रेंड आहे. या विकेंडला लंडनवासियांनी हा इव्हेंट साजरा केला. यामध्ये लंडन अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये अनेक प्रवासी अंडरवेअरवर फिरताना दिसले. विशेष म्हणजे यात महिला आणि पुरुषही होते. 

अंगामध्ये सूट किंवा शर्ट, स्वेटर होता. परंतू खाली पँट नव्हती. अनेकांनी खास या ईव्हेंटसाठी रंगीबेरंगी अंडरवेअर खरेदी केल्या होत्या. अंडरवेअरवर हे लोक बिनधास्त प्रवास करत होते. फोटो काढत होते. सोशल मीडियावर पोस्ट करत होते. चुकीच्या नजरेने कोणी कोणाला पाहत नव्हते. महिला-पुरुष एकमेकांना स्मितहास्य देत पुढे निघून जात होते. 

२००२ मध्ये या इव्हेंटला सुरुवात झाली होती. लंडनमध्ये हे ११ वे वर्ष होते. हा इव्हेंट इम्प्रूव्ह एव्हरीव्हेयरकडून आयोजित केला जातो. महत्वाचे म्हणजे हा ग्रुप अमेरिकेच्या न्यूयॉर्कचा आहे. एक कॉमिक परफॉरमेंस आर्ट ग्रुप आहे. सार्वजनिक ठिकाणी विनोदी गोष्टी करण्यासाठी हा ग्रुप ओळखला जातो.  

Web Title: No Trousers Tube Day No Ishsh....! People came in underwear on a London train, including women; even the onlookers have no shame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Londonलंडन