शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आफ्रिकेला जायची गरज नाही, भारतातील या नदीत सोने सापडते; बादल्या कमी पडतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 16:54 IST

झारखंडमधील स्वर्णरेखा नदी लोकांसाठी कमाईचे साधन बनली आहे. या नदीच्या पाण्यातून सोने मिळते, ते विकून लोक पैसे कमवत आहेत.

भारतात हजारो नद्या आहेत. सोन्यापेक्षाही मौल्यवान पाण्याखालील जीवन आहे. गावाकडून वाहता वाहता शुद्ध असलेल्या या नद्या शहरात प्रदुषित बनून जातात. या नद्यांच्या काठावर, पाण्यावर लाखो लोक जगतात. परंतू, अशी एक नदी भारतात आहे जिच्या पाण्यातून खरोखरचे सोने सापडते. तुम्ही ऑफ्रिका, टांझानियातील सोन्याच्या शोधात असलेल्या लोकांचे व्हिडीओ पाहिले असतील, पण अशी एक रहस्ययमी नदी आहे जिच्यातून सोने काढालयाला लोकांना बादल्या कमी पडतात. 

झारखंडमधील स्वर्णरेखा नदी लोकांसाठी कमाईचे साधन बनली आहे. या नदीच्या पाण्यातून सोने मिळते, ते विकून लोक पैसे कमवत आहेत. या नदीत एवढे सोने येते कुठून हा मात्र प्रश्नच बनून राहिला आहे. अनेक वैज्ञानिकांनीदेखील यावर रिसर्च केला आहे, परंतू त्यांनाही याचे यश आलेले नाही. झारखंडमधील ज्या नदीबद्दल आपण बोलत आहोत, ती नदी स्वर्णरेखा या नावाने ओळखली जाते. पाण्यासोबत नदीत वाहणाऱ्या सोन्यामुळे तिला स्वर्णरेखा म्हणतात. ही नदी रांचीपासून 16 किमी अंतरावर आहे, तिची 474 किमी लांबी आहे.

ही नदी उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागातून वाहते. सोन्याचे कण हे स्वर्णरेखा आणि उपनदी करकरीमध्ये आढळतात. करकरी नदीतूनच सोन्याचे कण वाहून सुवर्णरेखा नदीपात्रात येतात असा लोकांचा समज आहे. या दोन नद्यांमध्ये सोन्याचे कण कोठून येतात हे आजही एक गूढच आहे.

विशेष म्हणजे हे हजारो वर्षांपासून होत आहे. नदी अनेक खडकांमधून वाहते. यावेळी होणाऱ्या घर्षणातून सोन्याचे कण पाण्यात मिसळत असतील असा अंदाज वैज्ञानिकांनी लावला आहे. या नदीतून सोने काढणे कठीण आहे. परंतू, रेतीतून सोन्याचे कण गोळा करावे लागतात. हे कण तांदळाएवढे किंवा त्याहून छोटे असतात. निक आदिवासी सकाळी या नदीवर जातात आणि दिवसभर नदीच्या वाळूमधून सोन्याचे कण गोळा करतात.  

टॅग्स :Goldसोनंriverनदी