बाजूच्या घरातून रात्री येतात 'विचित्र आवाज', शेजाऱ्याने पत्र लिहिलं, मालकीणीने स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:15 PM2021-03-18T12:15:30+5:302021-03-18T12:20:26+5:30

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, डेलिरिअस डाटेर नावाच्या महिलेने ट्विटरवर एक पत्र जारी केलं. जे शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर त्यांच्या घराच्या एजंटने लिहिलं होतं.

Neighbour asks to stopping annoying noises woman shares letter on twitter got viral | बाजूच्या घरातून रात्री येतात 'विचित्र आवाज', शेजाऱ्याने पत्र लिहिलं, मालकीणीने स्पष्टच सांगितलं!

बाजूच्या घरातून रात्री येतात 'विचित्र आवाज', शेजाऱ्याने पत्र लिहिलं, मालकीणीने स्पष्टच सांगितलं!

Next

ब्रिटनमधील एक परिवार त्यांच्या शेजाऱ्यांमुळे चांगलाच हैराण आहे. डोकेदुखीचं कारण होतं बाजूच्या घरातून येणार विचित्र आवाज. हे आवाज त्यांना विचित्र आणि शरीरसंबंध ठेवताना येतात तसे वाटत होते. ज्यामुळे त्यांना आपल्या लेकरांसमोर अवघडल्यासारखं वाटत होतं. ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी घराच्या एजंटला संपर्क केला. पण त्यानंतर जे झालं त्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. 

घराच्या एजंटने शेजाऱ्याला लिहिलं पत्र

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, डेलिरिअस डाटेर नावाच्या महिलेने ट्विटरवर एक पत्र जारी केलं. जे शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर त्यांच्या घराच्या एजंटने लिहिलं होतं. या पत्रात लिहिलं गेलं आहे की, तुमच्या घरातून विचित्र आवाज येतात. ज्यामुळे माझ्या दुसऱ्या क्लाएंटला फार लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. पत्रात लिहिले आहे की, हे आवाज "sexual noises" सारखे असतात. हे आवाज कमी करण्याचा सल्ला तुम्हाला देत आहोत'. (हे पण वाचा : 'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!)

काय दिला सल्ला?

पत्रात लिहिले आहे की, तुम्ही तुमच्या हेडबोर्ड(बेडच्या मागच्या बाजूला असलेला लाकडी भाग) आणि भींतीच्या मधे काही साहित्य ठेवा. जेणेकरून बेडच्या खटपटीने शेजाऱ्यांना घरात आवाज जाणार नाहीत. आणि प्रयत्न करा की, जेव्हा तुम्ही संबंध ठेवत असाल तेव्हा आवाज कमी करा. कारण शेजारी लहान मुले असलेला परिवार राहतो. हे पंत्र महिलेने ट्विटरवर शेअर केलं आहे. ज्यानंतर लोक मजा घेत आहेत. (हे पण वाचा : बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....)

महिला काय म्हणाली?

एजंटकडून हे पत्र मिळाल्यानंतर महिलेने ट्विटरवर आपलं मत मांडलं आणि सांगितलं की, हे बघा, माझ्या मुलीला कसा सल्ला मिळाला आहे. मुळात सत्य हे आहे की माझ्या मुलीची दोन आठवड्यांपूर्वी बॅक सर्जरी झाली आहे. अशात ती असं काही करण्यासाठी सक्षम नाही. आणि हो, तिच्या घरात हार्डबोर्डही नाहीये.

हे पत्र वाचून सोशल मीडिया यूजर्स मजेदार प्रतिक्रिया देत आहे. एक महिला म्हणाली की, हे पत्र फोटो फ्रेम करून ठेवण्याच्या लायकीच आहे. तर काही लोकांनी आपलेही असे विचित्र अनुभव शेअर केले आहेत.
 

Web Title: Neighbour asks to stopping annoying noises woman shares letter on twitter got viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.