Lokmat Money > बिझनेस न्यूज > बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार

बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार

आपल्याकडे एफडी हा गुंतवणुकीचा सर्वात्तम मार्ग मानला जातो. अनेकांनी एफडीमध्ये गंतवणूक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 04:08 PM2024-05-25T16:08:07+5:302024-05-25T16:09:55+5:30

आपल्याकडे एफडी हा गुंतवणुकीचा सर्वात्तम मार्ग मानला जातो. अनेकांनी एफडीमध्ये गंतवणूक केली आहे.

amrit kalash fd scheme of SBI will offer up to 7.60% interest on 400 days FD | बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार

बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार

गुंतवणूक ही एक महत्वाची गोष्ट मानली जाते. आपल्याकडे गुंतवणूक म्हटलं की आधी एफडीची चौकशी केली जाते. एफडी ही एक सर्वात महत्वाची आणि जास्त फायदा मिळवून देणारी योजना आहे. यामुळे अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. 

एडी'मध्ये गुंतवणूक केल्याने, ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर उत्पन्न मिळते. एफडी बाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ३० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या सर्वात लोकप्रिय योजने अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत ​​आहे. 

हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ

SBI अमृत कलश ही ४०० दिवसांची FD योजना आहे, यामध्ये सामान्य ग्राहकांना गुंतवणुकीवर ७.१०% व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ५० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ७.६० टक्के पर्यंत अतिरिक्त व्याज मिळते. या योजनेंतर्गत ग्राहक जास्तीत जास्त २ कोटी रुपये जमा करू शकतात. एसबीआयने गेल्या वर्षी १२ एप्रिल २०२३ रोजी ही योजना सुरू केली होती.

अनेकवेळा मुदत वाढवली

FD योजना लोकप्रिय आहे. यामुळे SBI ला अनेक वेळा त्याची मुदत वाढवावी लागली. ही योजना सुरू केल्यानंतर, SBI ने पहिल्यांदाच २३ जून २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतची अंतिम मुदत वाचली. नंतर बँकेने ती पुन्हा २१ मार्च २०२४ पर्यंत वाढवली. पुन्हा एकदा बँकेने या विशेष FD योजनेची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे.

SBI च्या विशेष FD योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतात. एसबीआय अमृत कलश एफडी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी कागदपत्रे म्हणून आवश्यक असतील. यानंतर बँक तुम्हाला या योजनेसाठी एक फॉर्म देईल, तो भरल्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल.

Web Title: amrit kalash fd scheme of SBI will offer up to 7.60% interest on 400 days FD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.