NASA Rover Perseverance Mars life : अमेरिकन अंतराळ संस्था नासा बऱ्याच काळापासून मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीच्या अनुषंगाने कार्यरत आहे. त्यांचे अनेक प्रकारचे शोध सुरू आहेत. यासोबतच येथे जीवसृष्टी शोधण्यासाठी नासाकडून प्रयत्नही केले जात आहेत. आता या प्रयत्नात नासाला मोठे यश मिळाले आहे. मंगळावर पाठवलेल्या रोव्हर पर्सिव्हरेन्सने कोरड्या नदीच्या प्रवाहात खडक शोधले आहेत, ज्यामुळे शास्त्रज्ञांच्या मंगळावरील जीवसृष्टीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
'रोव्हर पर्सिव्हरेन्स'ची कमाल
अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे रोव्हर पर्सिव्हरेन्स हे मंगळावर बऱ्याच काळापासून काम करत आहे. या रोव्हरने तिथे एक कोरडी नदी शोधली आहे. यासोबतच तिथल्या जुन्या कोरड्या नदीपात्रात खडक सापडले आहेत. या खडकांमध्ये अशा खुणा दिसतात, ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की अब्जावधी वर्षांपूर्वी तिथे सूक्ष्म जीवन अस्तित्वात असावे. बुधवारी पर्सिव्हरन्सच्या या शोधाबद्दल शास्त्रज्ञांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नमुन्यांची तपासणी करावी लागेल. त्यानंतरच काही सांगता येईल.
नासाचा हा शोध खूप खास आणि चर्चेचा विषय मानला जात आहे. कारण नासा बऱ्याच काळापासून म्हणजेच वर्षानुवर्षे मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेत आहे. कोरड्या नद्यांच्या उपस्थितीवरून हे स्पष्ट होते की तिथे कधीतरी पाणी असेल. जर असे असेल तर तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यताही आहे. पर्सिव्हरेन्सने गोळा केलेल्या डेटामुळे त्या आशा वाढल्या आहेत. नासाचे पर्सिव्हरेन्स रोव्हर फेब्रुवारी २०२१ मध्ये उतरवण्यात आले होते. त्याचे काम प्राचीन जीवनाचे संकेत आणि नमुने गोळा करणे आहे. गेल्या ४ वर्षांत ३० हून अधिक नमुने गोळा करण्यात आले आहेत.