World's Most Beautiful Girl : जगातल्या सर्वात सुंदर मुलीची सोशल मीडियात रंगली चर्चा, काहींनी केली टीका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 16:24 IST2018-07-31T16:23:31+5:302018-07-31T16:24:40+5:30
सध्या या मुलीचे फोटो सोशम मीडियात चर्चेचा विषय ठरत असून ही ५ वर्षांची मुलगी जगातली सर्वात सुंदर मुलगी असल्याचं बोललं जात आहे.

World's Most Beautiful Girl : जगातल्या सर्वात सुंदर मुलीची सोशल मीडियात रंगली चर्चा, काहींनी केली टीका!
सध्या सोशल मीडियामुळे अनेकांना जगासमोर येण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. सध्या या मुलीचे फोटो सोशम मीडियात चर्चेचा विषय ठरत असून ही ५ वर्षांची मुलगी जगातली सर्वात सुंदर मुलगी असल्याचं बोललं जात आहे. अनेकांना हे अशक्य वाटतं पण हे सत्य असल्याचं सांगितलं जात आहे.
ही मुलगी नायजेरियाची असून तिचं नाव Jare Ijalana हे आहे. सावला रंग, सुंदर डोळे आणि आत्मविश्वासाने पोज देणाऱ्या या मुलीचे फोटो Mofe Bamuyiwa या फोटोग्राफरने काढले आहेत.
Ijalana चे सुंदर फोटो Bamuyiwa ने ट्विटर आणि इन्स्टाग्रावर शेअऱ केले आहेत. या फोटोंना 'ओह! ती एक मनुष्य आहे...ती एक परी आहे', असं कॅप्शन दिलं आहे.
Ijalana च्या सुंदरतेचं सध्या भरभरुन कौतुक केलं जात आहे. पण ही ५ वर्षांची मुलगी मॉडल म्हणून समोर येत असल्याने काहींनी फोटोग्राफरवर टीका सुरु केली आहे. पण लोकांच्या टीकेकडे फोटोग्राफर काही लक्ष देत नाहीये.
Ijalana ला दोन बहिणीही आहेत. फोटोग्राफरला या मुलींच्या डोळ्यातील खरेपणा आणि साधेपणा समोर आणायचा होता. पण समाजाला हे समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल.