लहान मुलांची नग्न छायाचित्रे सोशल मिडियावर

By Admin | Updated: October 22, 2015 00:01 IST2015-10-21T20:40:04+5:302015-10-22T00:01:22+5:30

चीनमध्ये एका बालवाडीच्या महिला शिक्षिकेने २० हून अधिक लहान मुलांची नग्नावस्थेतील छायाचित्र सोशल मिडियावर अपलोड केली आहेत. यामुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Naked photographs of young children on social media | लहान मुलांची नग्न छायाचित्रे सोशल मिडियावर

लहान मुलांची नग्न छायाचित्रे सोशल मिडियावर

ऑनलाइन लोकमत

बीजिंग, दि.२१ - चीनमध्ये एका शाऴेत शिकणा-या वीस पेक्षा जास्त लहान मुलांची नग्न छायाचित्रे याच शाऴेतील एका शिक्षिकेने सोशल मिडीयावर अपलोड केली आहेत. यामुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मा आसे असे या महिला शिक्षिकेचे नाव असून ती या शाळेत लैंगिक शिक्षण या विषयावर मुलांना शिकवत असल्याचे समजते. तिने या विषयी बोलताना सांगितले की, ही सर्व मुले गोंडस असून त्यांना अनेकांनी लाईक करावे यासाठी मी त्यांची काही नग्न छायाचित्रे सोशल मिडीयावर अपलोड केली. यात काय गैर नसून हा एक लैंगिक शिक्षणाचा प्रकार असल्याचेही तिने म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी या शिक्षिकेने यासंदर्भात पालकांची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त मुलांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली आहे.  

 

Web Title: Naked photographs of young children on social media