शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आसमान से गिरे, खजूर में अटके...पोलिसांच्या भीतीने मगरींच्या परिसरात जाऊन लपला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 15:23 IST

हा परिसर पूर्णपणे मगरींचा आहे. तो अनेक दिवस इथे लपून राहिला. त्याचे कपडे फाटले. तो कीटक खाऊन पोट भरत राहिला. तो कसा वाचला ते जाणून घेऊ. 

हिंदीत एक म्हण आहे आसमान से गिरे, खजूर में अटके...या म्हणीला साजेशी एक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पोलिसांना घाबरून एक गन्हेगार अशा जागी जाऊन लपला जिथे मृत्यूशिवाय काही नव्हतं. तो लपण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सुदूर उत्तरी परिसरातील मॅनेग्रूव्समध्ये जाऊन पोहोचला. हा परिसर पूर्णपणे मगरींचा आहे. तो अनेक दिवस इथे लपून राहिला. त्याचे कपडे फाटले. तो गोगलगाय खाऊन पोट भरत राहिला. तो कसा वाचला ते जाणून घेऊ. 

ऑस्ट्रेलियातील डार्विन परिसरात राहणारे दोन मच्छिमार केविड ज्वाइनर आणि कॅम फॉस्ट मॅनग्रूव्सकडे मासे पकडण्यासाठी जात होते. तेव्हाच त्यांना एका मनुष्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर एक अंगात कपडे नसलेली व्यक्ती झाडाच्या फांदीवर लटकलेली आहे आणि मदत मागते आहे.

केविन आणि कॅमने त्याला व्यवस्थित पाहिलं तर त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शरीरावर मगरीने चावल्याचे निशाण होते. तो मातीने पूर्णपणे माखलेला होता. तो फार कमजोर आणि बारीक झालेला दिसत होता. त्याला खायला न मिळाल्याने त्याचे हाडं दिसू लागली होती.

कॅम आणि केविनने सांगितले की, आम्हाला माहीत नाही तो किती दिवसांपासून तिथे लपला होता. मात्र, बोलता बोलता त्या गुन्हेगाराने सांगितले की, नव्या वर्षाच्या आदल्या रात्री तो तिथे आला होता. त्याला काही ठिकपणे आठवत नाही. तो या परिसरात फिरत आला होता आणि रस्ता विसरला होता.

पोलिसांपासून पळालेल्या या व्यक्तीला केविन आणि कॅमने नावेत बसवलं. त्याला घालायला कपडे दिले आणि पिण्यासाठी बीअर दिली. नंतर त्याला घेऊन ते डार्विन शहराकडे गेले. जसा तो अ‍ॅम्बुलन्सने हॉस्पिटलमध्ये पोहोचला पोलिसांनी त्याला अटक केली. 

ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दन टेरीटरी वॉच कमांडर लेन टर्नरने सांगितले की, त्या गुन्हेगारावर पोलिसांच्या निरीक्षणाखाली उपचार होत आहेत. त्याच्यावर अनेक केसेस आहेत. ज्यात शस्त्रांचा धाक दाखवून लूट करणे असे गुन्हे आहेत. तो बरा झाल्यानंतर त्याला तुरूंगात शिफ्ट केलं जाईल. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी