(Image Credit : Social Media)
जगातल्या अनेक आश्चर्यकारक ठिकाणांबाबत तुम्ही नेहमी ऐकत किंवा वाचत असाल. आज आम्हीही तुम्हाला अशाच एका वेगळ्या ठिकाणाबाबत सांगणार आहोत. मेक्सिकोमध्ये एक ठिकाण आहे. या ठिकाणाला 'झोन ऑफ सायलेन्स' असं म्हटलं जातं. इथे घडणाऱ्या गोष्टींबाबत वाचल्यावरच तुम्हाला कळेल की, या ठिकाणाला 'झोन ऑफ सायलेन्स' का म्हटलं जातं.
इथे घडमारी सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे इथे आल्यावर जगातले कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणं काम करणं बंद करतात. असे म्हणतात की, इथे असं काही आहे, ज्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची रेडिओ फ्रीक्वेंसी काम करत नाही.
हे ठिकाण मेक्सिकोमधील चिहुआहुआ वाळवंट म्हणून ओळखलं जातं. मात्र, हे आजपर्यंत कुणालाही कळू शकलं नाही की, इथे इलेक्ट्रॉनिक डिवाइस काम करणं बंद का करतात? याशिवाय आणखीही काही आश्चर्यकारक गोष्टी या ठिकाणाबाबत आहेत.
या ठिकाणी १९३८ मध्ये उल्कापात झाला होता. त्याचवेळी हे ठिकाण चर्चेत आलं होतं. त्यानंतर १९५४ मध्ये दुसऱ्यांदा इथे उल्कापात झाला होता. तेव्हापासून इथे काहीतरी विचित्र घडतं असा दावा लोक करतात.
असे सांगितले जाते की, या रहस्यमय जागेवर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद का पडतात याचा शोध घेण्यासाठी एक टेस्ट करण्यात आली होती. तेव्हा अमेरिकेचं एक टेस्ट रॉकेट पडलं होतं. त्यानंतर या ठिकाणी लोक हे बघण्यासाठी पोहोचले. तेव्हा कम्पास आणि जीपीएस चक्रीप्रमाणे गोल फिरू लागले होते.
या ठिकाणाला 'झोन ऑफ सायलेन्स' हे नाव १९६६ मध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी एक तेल कंपनी इथे शोध करण्यासाठी आली होती. कंपनीच्या लोकांनी जेव्हा ५० किलोमीटर परिसरात शोध सुरू केला तर ते हैराण झाले. कारण इथे इलेक्ट्रॉनिक डिवाइस काम करणे बंद झाले होते. त्यांना रेडिओ सिग्लही मिळू शकत नव्हते.