इथे आहे देशातील पहिलं कॅट कॅफे, मांजरींसोबत घालवू शकता वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 10:53 AM2018-09-12T10:53:54+5:302018-09-12T10:56:32+5:30

आम्ही तुम्हाला अशा एका कॅफेबाबत सांगणार आहोत जिथे लोक चहा-कॉफी कमी आणि येथील होस्ट्ससोबत वेळ घालवायला जास्त येतात.

Must visit India's first cat cafe in Mumbai | इथे आहे देशातील पहिलं कॅट कॅफे, मांजरींसोबत घालवू शकता वेळ!

इथे आहे देशातील पहिलं कॅट कॅफे, मांजरींसोबत घालवू शकता वेळ!

रिकामा वेळ घालवण्यासाठी किंवा स्ट्रेस दूर करण्यासाठी तुम्ही कधीना कधी एखाद्या कॅफेमध्ये गेले असालच. कुठला चहा तुम्हाला आवडला असेल तर कुठली कॉफी तुम्हाला आवडली असेल, पण आम्ही तुम्हाला अशा एका कॅफेबाबत सांगणार आहोत जिथे लोक चहा-कॉफी कमी आणि येथील होस्ट्ससोबत वेळ घालवायला जास्त येतात. आम्ही तुम्हाला सांगत आहोत देशातील पहिल्या कॅट कॅफेबाबत. इथे तुम्ही तुमचा पूर्ण वेळ मांजरींसोबत घालवू शकता. कुठे आहे हा कॅट कॅफे? चला जाणून घेऊ याची खासियत....

View this post on Instagram

कुठे आहे हा कॅट कॅफे?

भारतातील पहिला कॅट कॅफे मुंबईमध्ये सुरु झाला आहे. या कॅफेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही इथे एकटे या किंवा मित्रांसोबत, लॅपटॉप घेऊन या किंवा पुस्तकं तुमचं सगळं लक्ष तेथील मांजरींकडे जाईल. मनुष्य आणि प्राण्यातील सुंदर नातं बघायचं असेल तर तुम्ही या कॅफेला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सुविधांसोबतच मांजरांची साथही मिळेल.

View this post on Instagram

एन्ट्रीचे आहेत काही नियम

कोणत्याही सामान्य कॅफे प्रमाणे तुम्ही इथे असेच येऊ शकत नाहीत. या कॅफेमध्ये मांजरींसाठी एक स्वच्छ वातावरण तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे इथे येण्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागतं. कॅफेमध्ये शिरण्याआधी तुम्हाला वॉश बेसिनमध्ये स्वच्छ हात धुवावे लागतात. तसेच आत शिरण्याआधी चपला आणि शूज बाहेर काढावे लागतात. त्यासोबतच कॅफेमध्ये आरडाओरड करण्यावर बंदी आहे.

View this post on Instagram

दत्तक घेऊ शकता मांजर

तुम्हाला हवी असेल तर तुम्ही येथून मांजर दत्तक घेऊ शकता. पण यासाठीचे नियम आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे की, मांजरीला तुम्ही नाही तर मांजर तुम्हाला निवडेल. याचा अर्थ जी मांजर तुम्हाला दत्तक घ्यायची आहे तिच्यासोबत तुम्हाला काही दिवस वेळ घालवावा लागेल. जर तिने तुम्हाला पसंत केलं किंवा तुमच्याशी ती मिसळली तरच तुम्ही ती मांजर दत्तक घेऊ शकता.

View this post on Instagram

इथे आहेत पपेट कॅफे

मंबईतील या कॅफेमध्ये मांजरींना रेस्क्यू सुद्धा केलं जातं. म्हणजे जर कुणाला एखादी मांजर रस्त्यात मिळाली तर ती इथे आणून देऊ शकतात. या कॅफेसारखंच देशातील वेगवेगळ्या भागात पपेट कॅफे सुरु करण्यात आले आहेत. यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या प्राण्यांसोबत वेळ घालवू शकता.
 

View this post on Instagram

Web Title: Must visit India's first cat cafe in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.