शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

याला म्हणतात नशीब! मुंबईतील परिवाराला परत मिळालं २२ वर्षाआधी गायब झालेलं ८ कोटींचं सोनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 15:25 IST

चोरी झालेल्या वस्तूंमध्ये राणी विक्टोरीयाचा फोटो असलेलं एक सोन्याचं नाणं, २ सोन्याच्या बांगड्या, १३०० ग्रॅम आणि  २०० मिलीग्रॅम वजनाच्या दोन वस्तूंचा समावेश आहे. १३ वर्षाआधी संपूर्ण वस्तुंची किंमत १३ लाख रूपये होती.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

कधी कुणाचं नशीब कसं चमकेल सांगता येत नाही. कधीही काहीही होऊ शकतं. रस्त्यावरील व्यक्ती महालात जाऊ शकतो तर महालातील रस्त्यावर येऊ शकतो. मुंबईतील एका परिवारासोबत असंच झालं. आहे. फॅशन ब्रॅन्ड Charagh Din च्या मालकाला २२ वर्षाआधी चोरी गेलेलं सोनं परत मिळालं आहे. या सोन्याची किंमत ८ कोटी रूपये इतकी आहे. 

सत्र न्यायाधीश यू.जी.मोरे यांनी गेल्या ५ जानेवारीला सोनं राजू दस्वानी यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय सुनावली. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये राणी विक्टोरीयाचा फोटो असलेलं एक सोन्याचं नाणं, २ सोन्याच्या बांगड्या, १३०० ग्रॅम आणि  २०० मिलीग्रॅम वजनाच्या दोन वस्तूंचा समावेश आहे. १३ वर्षाआधी संपूर्ण वस्तुंची किंमत १३ लाख रूपये होती आआणि आता ती वाढून ८ कोटी रूपय झाली आहे. राजू दस्वानीने बिल जमा केल्यावर हे सिद्ध झालं की, ही प्रॉपर्टी त्यांच्या परिवाराची आहे. 

न्यायाधीश म्हणाले की, 'या वस्तू खासकरून सोन्याच्या वस्तू पोलीस कस्टडीत ठेवण्याचा काही उपयोग नाही. १९ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. फरार आरोपीलाही अजून पकडण्यात आलेलं नाही. जर एखाद्या तक्रारदाराला प्रॉपर्टी मिळवण्यासाठी इतकी वर्ष लागत असतील तर न्याय आणि कायदे व्यवस्थेची खिल्ली उडवण्यासारखं आहे'.

The Times of India च्या रिपोर्टनुसार, पब्लिक प्रोसीक्यूटर इकबाल सोलकर आणि कुलाबाचे पोलीस इन्स्पेक्टर संजय डोन्नर म्हणाले की, त्यांना सोनं परत करण्यात काहीच अडचण नाही.

८ मे १९९८ मध्ये कुलाबातील अर्जून दस्वानीच्या घरी एका गॅंगने सोन्याची चोरी केली होती. आरोपींनी सिक्युरिटी गार्डला मारहाण केली आणि सेफच्या चाव्या हिसकावून घेतल्या होत्या. यानंतर गॅंगने दस्वानी आणि त्यांच्या पत्नीला बांधलं आणि मग चोरी केली.

१९९८ मध्येच गॅंगमधील तीन आरोपींना पकडण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून चोरी केलेल्या काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. ट्रायलनंतर १९९९ मध्ये तिघांना सोडून देण्यात आलं. तीन इतर आरोपी अजूनही फरार आहेत. २००७ मध्ये अर्जन दस्वानी यांचं निधन झालं.

राजू दस्वानीचे वकील म्हणाले की, कोर्टाचा हा आदेश ऐकून परिवाराला आनंद झाला. चोरी झालेल्या वस्तू त्यांच्या पूर्वजांच्या आहेत. परिवारातील सदस्यांचा भावना या वस्तूंसोबत जुळल्या आहेत. राजू दस्वानी आणि त्यांच्या दोन बहिणी या संपत्तीच्या कायदेशीर वारस आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या दोन्ही बहिणींनी आधीच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईGoldसोनंJara hatkeजरा हटकेThiefचोर