पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, भर चौकात दोघांमध्ये झाली हाणामारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 14:23 IST2023-05-16T14:21:33+5:302023-05-16T14:23:40+5:30
पतीने आपल्या पत्नीवर हात उचलला. त्यामुळे लोकांची गर्दी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, भर चौकात दोघांमध्ये झाली हाणामारी...
Husband Wife Fight: मध्य प्रदेश (MP) च्या ग्वाल्हेरमध्ये रस्त्यावर एक हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. एका महिलेवरून पती-पत्नीमध्ये चांगलाच वाद झाला. पत्नीचा आरोप आहे की, तिचा पती 2 महिन्यांपासून खोटं बोलून दुसऱ्या महिलेसोबत फिरत होता. दोघांनाही तिने रंगेहाथ पकडलं आणि दोघांनाही मारहाण केली. यादरम्यान पतीने आपल्या पत्नीवर हात उचलला. त्यामुळे लोकांची गर्दी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पतीला प्रेयसीसोबत पकडलं
ग्वाल्हेरच्या रस्त्यावर एका महिलेने तिच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं. ज्यानंतर त्यांच्यात मारहाण झाली. आधी पत्नी पतीच्या गर्लफेंडला मारहाण केली आणि त्यानंतर पतीने आपल्या पत्नीवर हल्ला केला. तिला खूप मारहाण केली.
पत्नीने आरोप केला की, तिचा पती तिच्यासोबत खोटं बोलत होता. तो त्याच्या गर्लफेंडसोबत गेल्या दोन महिन्यांपासून फिरत होता. जेव्हा तिला याबाबत समजलं तेव्हा तिने त्याला याबाबत विचारलं तर त्याने असं काही नसल्याचं सांगितलं. पण नंतर पतीचा भांडाफोड झाला. पत्नीने पतीला रंगेहाथ पकडलं.
दरम्यान पती-पत्नीमधील हे भांडण पाहून बरेच लोक तिथे जमा झाले होते. त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला. पण आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.