शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बोंबला! नवरदेवाच्या आईने त्याची स्टेजवरच चपलेने केली धुलाई, कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 18:43 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. अशात एक नवरदेवाची स्टेजवर चढते आणि पायातील चप्पल काढून नवरदेवाला मारू लागते.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वेगवेगळ्या लग्नांच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अशात एक लग्नातील (marriage) हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील एक लग्नात नवरदेवाच्या आईनेच त्याची चपलेने धुलाई (Mother beats groom) केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. अशात एक नवरदेवाची स्टेजवर चढते आणि पायातील चप्पल काढून नवरदेवाला मारू लागते. हा सगळा प्रकार महिलेने पाहुण्यांसमोर आणि नवरीसमोर केला. या घटनेचा व्हिडीओ उपस्थितांपैकी कुणीतरी रेकॉर्ड केला. ही घटना भरूवा सुमेरपूर गावातील आहे. 

लग्न सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेने सगळेच हैराण झाले. कुणालाच काही समजलं नाही की, महिलेने नवरदेवाला चपलेने का मारलं. मीडिया रिपोर्टनुसार, हे प्रकरण आंतरजातीय लग्नाचं आहे. असं समजतंय की, नवरदेवाची आई या लग्नासाठी तयार नव्हती. कारण मुलगी दुसऱ्या जातीची होती. मात्र, तरूणाने परिवाराच्या विरोधात जाऊन दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तरूण आणि तरूणीने आधीच कोर्ट मॅरेज केलं होतं. (हे पण वाचा : 'मी अल्पवयीन आहे, आताच लग्न करायंच नाही', मुलाकडील मंडळींना मुलीने केला फोन अन्....)

मीडिया रिपोर्टनुसार, नवरदेवाचे पालक आणि भाऊ त्याने केलेल्या कोर्ट मॅरेजमुळे रागावलेले होते. दुसरीकडे मुलीच्या वडिलाने कोर्ट मॅरेजनंतर दोघांचं रिसेप्शन ३ जुलैला ठेवलं होतं. मात्र, त्यांनी मुलाच्या परिवारातील कुणालाच या रिसेप्शनसाठी बोलवलं नाही. 

दरम्यान, नवरदेवाची आई कशीतरी मुलाच्या लग्नात पोहोलली आणि स्टेजवर जाऊन मुलाला चपलेने मारू लागली होती. तिथे उपस्थित असलेल्या काही पाहुण्यांनी महिलेला अडवलं आणि तिला घरी पाठवून देण्यात आलं. काही वेळासाठी लग्नात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्न