शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

काय सांगता! तुरूंगातील मुलाला वाचवण्यासाठी आईने हाताने खोदला ३५ फूट भुयारी मार्ग आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 17:13 IST

आतापर्यंत जगभरातील तुरूंग तोडण्याच्या आणि तुरूंगातून लांबच लांब भुयारी मार्ग बनवून कैदी पळाल्याच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. इतकेच काय अशाप्रकारचं कथानक असलेले अनेक सिनेमेही पाहिले असतील.

आतापर्यंत जगभरातील तुरूंग तोडण्याच्या आणि तुरूंगातून लांबच लांब भुयारी मार्ग बनवून कैदी पळाल्याच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. इतकेच काय अशाप्रकारचं कथानक असलेले अनेक सिनेमेही पाहिले असतील. पण यासंबंधी एक वेगळी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यूक्रेनमधील एका महिलेने तिच्या तुरूंगातील मुलाला वाचवण्यासाठी एकटीच  तब्बल ३५ फूट भुयारी मार्ग खोदायला निघाली होती. पण ही महिला तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होण्याआधीच पकडली गेली. आता ती सुद्धा तुरूंगात आहे.

मुलाला वाचवण्यासाठी ५१ वर्षीय महिलेने पूर्ण प्लॅन केला होता. या प्लॅननुसार तिने सर्वातआधी जपोरिझिआ परिसरात भाड्याने घर घेतलं. इथेच तिचा मुलगा तुरूंगात शिक्षा भोगत होता. महिलेने कुदळ आणि फावडं घेऊन खोदकाम सुरू केलं होतं. लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ती केवळ रात्री खोदकाम करत होती. तसेच या ठिकाणी पोहोचण्यासाठी ती आवाज न येणाऱ्या स्कूटरचा वापर करत होती.

अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर महिला १० फूट भुयारी मार्ग तयार करण्यात यशस्वी ठरली. मुलाला सोडवण्यासाठी तिला साधारण ३५ फूट खोदकाम करायचं होतं. महिला जास्तीत जास्त वेळ आपल्या घरातच राहत होता. जेणेकरून स्थानिकांनी तिला ओळखू नये किंवा त्यांच्या काही लक्षात येऊ नये. अंधार होताच ती भुयारी मार्गावर पोहोचायची आणि खोदकाम सुरू करायची. ट्रॉलीच्या मदतीने ती माती बाहेर काढत होती.

महिलेने साधारण ३ आठवडे खोदकाम केलं करून ३ टन माती काढली होती. पण अखेर पोलिसांच्या नजरेतून ती वाचू शकली नाही. पोलिसांनी तिला पकडले. महिलेच्या या कारनाम्यावर टीका होत आहे. तर काही लोक मुलाला वाचवण्यासाठी तिने केलेल्या कामाचं कौतुक करत आहेत.

हे पण वाचा :

हृदयद्रावक! मुलाला रात्री नदीवर जाणं पडलं महागात, सहाव्या दिवशी सापडला मगरीच्या पोटात!

बाबो! तिखट मिरचीचे मोमोज खाणं पडलं महागात, पोटात झाला स्फोट आणि...

बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी