शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला तब्बल ३ वर्षांने इंदुरला परतली, पण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 11:57 AM2020-12-23T11:57:09+5:302020-12-23T11:58:01+5:30

एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, २०१७ मध्ये ३८ वर्षीय महिला शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात गेली होती आणि मंदिरातून बाहेर आल्यावर बेपत्ता झाली'.

Missing for 3 years wife of man whose petition led to human trafficking probe returns | शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला तब्बल ३ वर्षांने इंदुरला परतली, पण.....

शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला तब्बल ३ वर्षांने इंदुरला परतली, पण.....

Next

दररोज जगात वेगवेगळ्या विचित्र किंवा सहजासहजी विश्वास बसणार नाही अशा घटना घडत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदुरमधून समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून तुम्हीही विचारात पडाल. इथे ३ वर्षांआधी बेपत्ता झालेली महिला सुखरूप घरी परतली आहे. 

The Indian Express च्या एका रिपोर्टनुसार, ३ वर्षे ४ महिन्याआधी इंदुरची एक महिलाशिर्डीला गेली होती आणि तिथे ती बेपत्ता झाली होती. ही बेपत्ता झालेली महिला गेल्या शनिवारी सापडली. एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, २०१७ मध्ये ३८ वर्षीय महिला शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात गेली होती आणि मंदिरातून बाहेर आल्यावर बेपत्ता झाली'.

यानंतर बेपत्ता महिला दीप्तीचा पती मनोज सोनीने बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपिठात आपल्या पत्नीला शोधण्यासाठी Habeas Corpus पिटिशन दाखल केली होती. यावर बॉम्बे हायकोर्टाने महाराष्ट्रातील टॉप पोलीस अधिकाऱ्याला शिर्डीच्या मंदिराजवळून गायब होणाऱ्या महिलांचा तपास ह्यूमन ट्रॅफिकिंगच्या दृष्टीने करण्याचा आदेश दिला.

मनोजचे वकिल सुशांत दीक्षित यांनी सांगितले की, गेल्या गुरूवारी सायंकाळी दीप्ती तिच्या बहिणीच्या घरी परतली. शुक्रवारी याची माहिती जस्टीस रवींद्र वी घुघे आणि जस्टीस बी.यू.देवदवार यांनी दिली. मनोजच्या सासऱ्यांनी फोन करून कोर्टाला दीप्तीची पसरण्याची बातमी दिली होती आणि सांगितले की, ३ वर्षांपासून दीप्ती इंदुरमध्येच होती आणि चेकअप केल्यावर समोर आलं आहे की, दीप्तीची मानसिक स्थिती ठिक नाही.

मनोज सोनीने सांगितले की, मी वडोदऱ्यात आपल्या ड्रायव्हिंग जॉबमध्ये होतो. तेव्हाच मला सायंकाळी ६ वाजता फोन आला की, माझी पत्नी इंदुरमधील बहिणीकडे परतली आहे. मी इंदुरला गेलो आणि तिला भेटलो. तिने हे नाही सांगितलं की, गेल्या ३ वर्षांपासून ती कुठे होती. तिने सांगितले की, ती मंदिराबाहेर दुकानात काही खरेदी करायला गेली होती तिथेच बेशुद्ध झाली. तिला काहीच आठवत नाही.

दीप्तीने आपल्या परिवाराला सांगितले की, ती ३ वर्षांपासून इंदुरमधील एका वयोवृद्ध महिलेसोबत राहत होती. दीप्ती हे सांगू शकत नाहीये की, ती शिर्डीहून इंदुरला कशी पोहोचली.
 

Web Title: Missing for 3 years wife of man whose petition led to human trafficking probe returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.