शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

डॉक्टर हादरले! मृत घोषित व्यक्ती अचानक उठून बसली; मृत्यूनंतर काय काय घडले हेही सांगितले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:18 IST

Kevin Hill Miracle Man of America: या व्यक्तीने मृत्यूनंतर अनुभवलेला प्रत्येक क्षण डॉक्टरांना सांगितला असून, मिरॅकल मॅन म्हणून तिला संबोधले जात आहे.

Kevin Hill Miracle Man of America: जगात कुठेही काहीही घडत असते. अनेकांना असे अनुभव येतात, ज्यावर कुणाचाही विश्वास बसणे निव्वळ अशक्य असते. मात्र, अनेकांना असे अनुभव येत असतात. जे शेअर केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. असाच एक अनुभव एका व्यक्तीला आला. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही या व्यक्तीला वाचवता आले नाही आणि काही क्षणात चमत्कार घडल्यासारखे ती व्यक्ती थेट उठून बसली. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर काय अनुभव आला तोही त्या व्यक्तीने सांगितला. या व्यक्तीने सांगितलेल्या अनुभवानंतर डॉक्टरही हादरले अन् अवाक् झाले. 

मृत्यू हा माणसाच्या आयुष्याचा शेवट असतो. त्यानंतर काहीही उरत नाही, असे मानले जाते. अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तिथे हृदयविकाराच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले, पण आश्चर्य म्हणजे काही वेळातच ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतर त्याच्यासोबत काय घडले हेही त्याने सांगितले. 

अमेरिकेतील मिरॅकल मॅन 

या ५५ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे केविन हिल असे आहे. सन २०२१ मध्ये त्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त झाले. परिणामी त्याचे पाय सुजले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या शरीरात काही गंभीर समस्या आहेत. यावर उपचार म्हणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. त्यांची त्वचा आणि रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शिअम साठू लागले. त्यांना वेदना होऊ लागल्या. एक दिवस त्यांच्या पायातून रक्त यायला लागले आणि अवघ्या काही तासांत त्यांच्या शरीरातून तब्बल दोन लिटरहून अधिक रक्त वाहून गेले. पाठोपाठ त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, अखेरीस त्यांना मृत घोषित करण्यात आले. काही क्षणांतच चमत्कार घडला आणि केविन अचानक जिवंत झाले. त्यांच्या शरीराची हालचाल पाहून डॉक्टर दचकलेच. त्यामुळेच केविनला द मिरॅकल मॅन असे संबोधले जात आहे.

मृत्यूनंतर काय काय घडले हेही सांगितले

मृत्यूनंतर त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी केविन यांना आठवतात. मृत्यूनंतर अनुभवलेला प्रत्येक क्षण सांगितला. ते म्हणाले की, मृत्यूनंतर आत्म्यासोबत गेलो होतो. माझा आत्मा शरीरात नव्हता. मला माझे शरीर दिसत नव्हते. जणू काही माझा आत्मा दुसर्‍याच्या नियंत्रणात होता. जे काही घडत होते, ते पाहू शकत होतो. तिथे खूप शांतता होती. मग अचानक असे वाटले की, मी झोपलो असून माझ्या शरीरातून होणारा रक्तस्राव थांबला आहे. आता माझ्या मृत्यूची वेळ आलेली नाही, असे मला वाटत होते. केविन यांना पांढरा प्रकाश दिसला का, असे विचारण्यात आले. यावर, असा कोणताही प्रकाश दिसला नाही. झोपेतून उठलो तेव्हा डॉक्टर माझ्यासोबत होते. माझ्या हृदयाचे ठोके सुरू होते आणि मला खूप शांत वाटत होते. आता ते घरी परतले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके