शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! अल्पवयीन मुलींनी एकमेकींसोबत केलं लग्न, एक बनली पती तर दुसरी बनली पत्नी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 14:44 IST

दोन्ही मुली(Lesbian) धनबादच्या(Jharkhand) सरायढेला क्षेत्रात राहणाऱ्या आहेत. यातील १४ वर्षांची मुलगी ती प्रियकर असल्याचं सांगत आहे. ती मुलांसारखी हेअरस्टाईल करते आणि तसेच कपडे घालते.

असं म्हणतात की, जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा तो जात, धर्म, भेदभाव, गरीब, श्रीमंत बघत नाही. झारखंडच्या (Jharkhand) धनबादमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे दोन अल्पवयीन मुलींनी(Lesbian) एकमेकींसोबत मंदिरात लग्न केलं. दोघीही आता परिवारापासून वेगळ्या राहतात. या लेस्बियन कपलपैकी एकीचं वय १४ तर दुसरीचं वय १३ वर्षे आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघींनाही आपापल्या परिवाराकडे वयस्क होईपर्यंत राहण्यासाठी पाठवलं आहे. 

दोन्ही मुली धनबादच्या सरायढेला क्षेत्रात राहणाऱ्या आहेत. यातील १४ वर्षांची मुलगी ती प्रियकर असल्याचं सांगत आहे. ती मुलांसारखी हेअरस्टाईल करते आणि तसेच कपडे घालते. ती कशाचीही भीती न बाळगता बिनधास्त उत्तरे देते. तर १३ वर्षांची मुलगी साधी, कमी बोलणारी आहे. 

(प्रातिनिधीक छायाचित्र)

या दोघींपैकी पती झालेल्या मुलीने सांगितले की, दोघी एकमेकींवर बालपणापासून प्रेम करतात. दोघीही एकमेकींशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. एकीने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्यांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं होतं. आणि जवळच एका झोपडीत राहत होत्या. अशात त्यांनी त्यांच्या एका मैत्रीणी मदत घेण्याचा विचार केला. पण तिने काही मदत केली नाही. त्यानंतर दोघीही घरी परत आल्या. 

दरम्यान १३ वर्षीय मुलीच्या आईने तिच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र पाहिलं. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. लगेच दोन्ही परिवारातील लोक पोलीस स्टेशनमध्ये गेले. हे प्रकरण धनबाद महिला पोलीस स्टेशनकडे देण्यात आलं.

पत्रकारांसोबत बोलताना स्वत:ला पती सांगणारी मुलगी म्हणाली की, 'आता आम्ही अल्पवयीन आहोत. जेव्हा आम्ही वयस्क होऊ तेव्हा मी माझ्या पत्नीला घरी परत आणेन आणि सोबत ठेवेल. मी तिच्यावर इतकं प्रेम करेन की, पुन्हा कधी पोलीस स्टेशनचं तोंड बघावं लागणार नाही. यादरम्यान तिच्या घरच्यांनी तिच्यासोबत जबरदस्ती केली तर मी तिला घेऊन येईन. याच अटीवर आम्ही दोघीही वयस्क होईपर्यंत आपापल्या घरी परतत आहोत'.

तेच पत्नी बनलेल्या मुलीने सांगितले की, 'माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तो माझा पती आणि मी त्याची पत्नी. पण आम्ही सध्या अल्पवयीन आहोत. त्यामुळे सध्या आपापल्या परिवाराकडे परतत आहोत. आम्ही वयस्क झाल्यावर सोबत राहू'.

या लेस्बियन कपलचे घरवाले सध्या फारच हतबल आणि रागात आहेत. त्यांना त्यांच्या मुली आपल्या घरी परत हव्या आहेत. ते म्हणतात की, एक मुलगी कधी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करू शकते का? ते दोघींचं हे नातं कोणत्या स्थितीत स्वीकारणार नाहीत. 

टॅग्स :JharkhandझारखंडrelationshipरिलेशनशिपLGBTएलजीबीटी