शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या बाथरूममध्ये सापडले असे लेटर, वाचून अवाक् झाले घरमालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 09:46 IST

एका कपलला त्यांच्या घराच्या बाथरूमचं काम करत असताना असं काही सापडलं जे पाहून ते अवाक् झाले.

लोकांना नेहमीच एखाद्या जुन्या घरात किंवा काही काम करताना असं काही सापडतं जे फार जुनं आणि काहीतरी खास असतं. अनेक काही महागड्या वस्तू असतात तर कधी असं काही सापडतं ज्यात एखादा संदेश असतो. अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये एका कपलला त्यांच्या घराच्या बाथरूमचं काम करत असताना असं काही सापडलं जे पाहून ते अवाक् झाले. कपलला अनेक वर्षाआधीचे लव्ह लेटर सापडले.

मॅट आणि केरी टेस्मरने सांगितलं की, त्यांच्या घराच्या बाथरूमच्या मागच्या भीतींमध्ये काही वस्तू सापडल्या. ज्यात औषधांच्या बाटल्या, गुलाब जल, ग्लिसरीन, रेजर आणि इतरही काही वस्तू सापडल्या. त्याशिवाय काही लव्ह लेटर सापडले जे एक मुलगा जॉन बी उर्फ लॉलीने दोन वेगवेगळ्या मुली हेजल आणि पॉलीनला लिहिले होते.

दोन्ही लेटरमध्ये जॉन बी याने आपलं प्रेम व्यक्त केलं होतं आणि डान्स नाइटसाठी विचारलं होतं. केरी टेस्मरने WCCO-TV ला सांगितलं की, दोन्ही लेटर वाचल्यावर आम्हाला जाणवलं की, या मुलाचं वय 13 ते 18 दरम्यानचं असावं. कपल म्हणालं की, ते अजून जॉन बी ला शोधू शकले नाहीत. पण घराचे मूळ मालक जॉन पावलो 1920 ते 1950 च्या दशकापर्यंत आपल्या परिवारासोबत राहत होते, त्यांचा एक मुलगा होता त्याचं नाव जॉन होतं. केरी टेस्मरने सांगितलं की, जॉन जोसेफ पावलो त्यावेळी साधारण 17 वर्षाचे असतील जेव्हा ते आपल्या परिवारासोबत या घरात होते.

दुसरा जॉन बुक असू शकतो, ज्याचा जन्म 1930 दरम्यान झाला होता. जेव्हा तो या घरात आला होता तेव्हा मोठा झाला होता. टेस्मरने सांगितलं की, त्यांना घरात जॉन बुकचे काही जुने होमवर्क सापडले होते. केरी टेस्मर म्हणाली की, मला या मागची कहाणी जाणून घ्यायची आहे आणि हेही जाणून घ्यायचं आहे की, हे लेटर का पाठवले गेले नाहीत तसेच ते आमच्या बाथरूमच्या भीतींत कसे पोहोचले हेही जाणून घ्यायचं आहे.

जुन्या घरांमध्ये अनेकदा अशा वस्तू सापडत असतात. काही दिवसांआधीही एका जुन्या घराच्या बाथरूममध्ये जे सापडलं होतं ते हैराण करणारं होतं. ते बघून लोक पळून गेले होते. वॉशिंग्टनच्या घराचं काम सुरू असताना एक ठेकेदाराने जेव्हा बाथटब हटवला तेव्हा त्याला एक बॉक्स आढळला. त्यात त्याला एक हॅंड ग्रेनड दिसला होता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका