'तो' मंत्री पाहत होता मेलेनिया ट्रम्पचे फोटो ?

By Admin | Updated: November 16, 2016 15:32 IST2016-11-16T14:22:37+5:302016-11-16T15:32:21+5:30

मोबाईलवर पॉर्न पाहताना पकडलेले कर्नाटकचे शिक्षण मंत्री तन्वीर सैत हे मेलेनिया ट्रम्पचे फोटो पाहत असल्याची नवी माहिती समोर आली आहे.

The minister was watching the photo of melanie trump? | 'तो' मंत्री पाहत होता मेलेनिया ट्रम्पचे फोटो ?

'तो' मंत्री पाहत होता मेलेनिया ट्रम्पचे फोटो ?

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १६ - टिपू जयंतीचा कार्यक्रम सुरु असताना मोबाईलवर पॉर्न पाहताना पकडलेले कर्नाटकचे शिक्षण मंत्री तन्वीर सैत हे मेलेनिया ट्रम्पचे फोटो पाहत असल्याची नवी माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने पोलिस अधिका-याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पोलिस अधिका-याने व्हिडीओ फुटेजच्या आधारे मंत्री मेलेनिया ट्रम्पचे फोटो पाहत असल्याचे सांगितले. 
 
मेलेनिया ट्रम्प ही अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर मेलेनिया ट्रम्पचे फोटो व्हॉटस अॅप आणि सोशल मीडियावर फिरत आहेत. मंत्री जे फोटो पाहत होते ते मेलेनियाच्या मॉडलिंगच्या दिवसातले होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची तिसरी पत्नी असलेली मेलेनिया लग्नाआधी मॉडलिंग करायची. 
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागितले स्पष्टीकरण
 
मेलेनिया ट्रम्पने न्यूड फोटोशूट केल्याचेही बोलले जाते. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सैतकडून स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान सैतने फोटो पाहताना त्याचे चित्रीकरण करणा-या पत्रकार आणि कॅमेरामन विरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे. 

 

Web Title: The minister was watching the photo of melanie trump?