श्रीमंत होणं सोपं नाही! या कोट्याधीश महिलेचे पैसे बचतीचे फंडे वाचून चक्रावून जाल.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 10:02 AM2021-01-30T10:02:07+5:302021-01-30T10:03:03+5:30

या महिलेने टीव्हीवरील एका कार्यक्रमात तिच्याबाबत अनेक गुपितांचा उलगडा केला आहे. तिने सांगितले की, ती कधी अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च करत नाही.

This millionaire woman eats cat food never buys anything new | श्रीमंत होणं सोपं नाही! या कोट्याधीश महिलेचे पैसे बचतीचे फंडे वाचून चक्रावून जाल.....

श्रीमंत होणं सोपं नाही! या कोट्याधीश महिलेचे पैसे बचतीचे फंडे वाचून चक्रावून जाल.....

Next

श्रीमंत सगळ्यांनाच व्हायचं असतं पण श्रीमंत होणं इतकंही सोपं नाही. खूपसारा पैसा कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. श्रीमंत होणं किती कठिण आहे हे अमेरिकेतील लॉस वेगासमधील Aimee Eliabeth या महिलेकडून पाहून लक्षात येतं. नुकत्यात तिने तिच्याबाबत अशा गोष्टी सांगितल्या आहे की, वाचून तुम्ही हैराण व्हाल आणि वाचून असाही विचार कराल की, श्रीमंत लोक असंही करतात?

इंडिया टाइम्सनुसार, या महिलेने टीव्हीवरील एका कार्यक्रमात तिच्याबाबत अनेक गुपितांचा उलगडा केला आहे. तिने सांगितले की, ती कधी अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च करत नाही. इतकंच काय तर किराण्याचं बिल कमी करण्यासाठी तिने अनेक मांजरीला खायला दिले जाणारे पदार्थही खाल्ले आहेत. एलिजाबेथची एकूण संपत्ती ३८ कोटी रूपये आहे.

महिन्याला किती खर्च करते?

५० वर्षीय एलिजाबेथने सांगितले की, ती महिन्याला १ हजार डॉलर(७२ हजार)पेक्षा जास्त पैसे खर्च करत नाही. ती सांगते की, 'मी माझं पाण्याचं हिटर बंद ठेवते. २२ मिनिटात पाणी गरम होतं. जेव्हा मी उठते तेव्हाच ते सुरू करते. मी यात जास्त वेळ घालवत नाही'.

पैशांची बचत

तिने सांगितले की, ती नवीन वस्तू फार कमी खरेदी करते. यातून ती रोज ८० डॉलर वाचवते. वर्षातून साधारण ती २००,०० डॉलर(१ कोटी ४५ लाख रूपये) यातून बचत करते.

पाहुण्यांनाही मांजरीचं जेवण दिलं

या शोमध्ये एलिजाबेथने अनेक गोष्टी मान्य केल्या आहेत. ती पतीपासून वेगळी राहते. तिचा पती मायकलने तिला घर दिलं आहे. येथील सफाईची व्यवस्थाही त्यानेच करून दिली आहे. यातून तिचं लाखोंचं बिल वाचतं. तिने या शोमध्ये हेही स्वीकारलं की, लाइट ग्रेवीमध्ये चिकन आणि टुना अनेकदा पाहुण्यांना खाऊ घातलंय. हेच तिची मांजर खाते. ती सांगते की, लोकांना हे विचित्र वाटू शकतं. पण तिला काही फरक पडत नाही. यातून पैसे वाचतात.

१७ वर्ष जुनी कार वापरते

तिला तिच्या कामानिमित्ताने अनेकदा लॉस एंजलिसला जावं लागतं. पण ती आजही तिची १७ वर्ष जुन्या कारने प्रवास करणं पसंत करते. यात तिला वेळ जास्त लागतो पण नवीन कारचे तिचे लाखो रूपये वाचतात. बघितलं श्रीमंत होणं किती कठिण असतं ते.....

Web Title: This millionaire woman eats cat food never buys anything new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.