शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भारतातील एक असं गाव जिथे पत्नी प्रेग्नेंट होताच पती करतो दुसरं लग्न, कुणीच करत नाही विरोध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:02 IST

Husband Remarry After Wife Is Pregnant : सात जन्म एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेणारा पती पत्नी प्रेग्नेंट झाली की, लगेच दुसरं लग्न करतो. तरीही पत्नी किंवा समाज त्यांना काही म्हणत नाही. याचं एक खास कारण म्हणजे पाणी.

Husband Remarry After Wife Is Pregnant : मनुष्याच्या आयुष्यात लग्नाचा कार्यक्रम फार महत्वाचा असतो. लग्नाचं बंधन हे पवित्र मानलं जातं. खासकरून हिंदू लोकांमध्ये लग्नाला फार महत्व असतं. भारतात कायद्यानुसार हिंदू धर्मानुसार एक लग्न करण्याची परवानगी आहे. पण भारतातील एका राज्यात एक असाही भाग आहे जिथे पुरूष आरामात दुसरं लग्न करतात. पुरूष हे दुसरं लग्न तेव्हा करतात जेव्हा त्यांची पत्नी प्रेग्नेंट असते. आश्चर्याची बाब म्हणजे गर्भवती पत्नीही पतीला हे लग्न करण्यासाठी परवानगी देते.

सात जन्म एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेणारा पती पत्नी प्रेग्नेंट झाली की, लगेच दुसरं लग्न करतो. तरीही पत्नी किंवा समाज त्यांना काही म्हणत नाही. याचं एक खास कारण म्हणजे पाणी. पाणी हेच कारण आहे ज्यामुळे गर्भवती पत्नीही आनंदाने पतीचं दुसरं लग्न लावून देते. आता तुम्ही म्हणाल की, हे कोणतं कारण आहे? चला तर जाणून घेऊ एका अशा गावाबाबत जिथे केवळ आणि केवळ पाण्यासाठी एक गर्भवती पत्नी पतीचं दुसरं लग्न लावून देते.हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे.

जेव्हाही या गावात एखाद्या व्यक्तीची पत्नी प्रेग्नेंट राहते तेव्हा तिचा पती लगेच दुसरं लग्न करतो. या लग्नावर त्याच्या पत्नीला किंवा गावातील कुणालाही आक्षेप नसतो. कारण असं आहे की, या गावात किंवा आजूबाजूला पाण्याची मोठी समस्या आहे. अशात महिला दूरदूर जाऊन पाणी आणतात. पण महिला जेव्हा प्रेग्नेंट होतात तेव्हा पाणी आणू शकत नाहीत. अशात पती पाण्यासाठी दुसरं लग्न करतो.

या भागात पाण्याची मोठी समस्या आहे. पुरूष तर घरातील काम करत नाहीत. अशात महिलाच चेहरा झाकून दूरदूर पाणी भरण्यासाठी जातात. पण जेव्हा घरातील महिला गर्भवती होते तेव्हा तिला भरणं अवघड होतं. अशात महिलेचा पती दुसरं लग्न करतो. जेणेकरून घरात पाणी आणता यावं. गर्भवती महिला घरातील काम करते आणि दुसरी महिला पाणी भरायला जाते. या लग्नावरून पहिल्या पत्नीला कोणतीही समस्या नसते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेRajasthanराजस्थानmarriageलग्न