सलाम! ४०० दिवसात ८० हजारांपेक्षा जास्त झाडं लावली; जाणून घ्या 'या' वृक्षप्रेमीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 04:25 PM2020-06-05T16:25:40+5:302020-06-05T16:34:00+5:30

४०० दिवसात  जवळपास १५ राज्यात सायकलिंग करून यांनी  २२ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.

Meet green man narpat singh rajpurohit who cycling 14 states to save environment | सलाम! ४०० दिवसात ८० हजारांपेक्षा जास्त झाडं लावली; जाणून घ्या 'या' वृक्षप्रेमीची कहाणी

सलाम! ४०० दिवसात ८० हजारांपेक्षा जास्त झाडं लावली; जाणून घ्या 'या' वृक्षप्रेमीची कहाणी

Next

पर्यावरणाला वाचवण्याासाठी आणि पर्यावरणाप्रती आपले कर्तव्य पूर्ण करण्याासाठी ८० हजारांपेक्षा जास्त झाडं लावत असलेल्या या व्यक्तीचं नाव नरपत सिंह राजपुरोहित आहे. ३ जुनला जगभरात विश्व सायकल दिवस साजरा केला जातो.  याच दिवशी फेसबुक लाईव्हच्या माध्यामतून नरपत सिंह याने आपली गोष्ट  लोकांपुढे मांडली आहे. आत्तापर्यंत या व्यक्तीने ८७ हजार झाडं लावली आहेत. बाडमेरच्या लंगेरा गावातील निवासी असलेल्या नरपत सिंह राजपुरोहित यांचे वय ३५ वर्ष आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त झाडं लावली नाही तर ७० टक्के झाडांची  काळजी सुद्धा घेतली आहे. 

४०० दिवसात  जवळपास १५ राज्यात सायकलिंग करून यांनी  २२ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. ऊन, थंडी, पाऊस वातावरणातील बदलांचे भान न ठेवता यांनी आपली वृक्षसेवा सुरू ठेवली.  यावर्षीच्या पावसात जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचा आणि  त्याचे संरक्षण करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यांनी २७ जानेवारी २०१९ ला आपल्या प्रवासाला सुरूवात केली.  जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, पंजाब हरीयाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक याशिवाय दीव दमणपर्यंत त्यांनी झाडं लावली.

नरपत सिंह राजपुरोहित यांनी सांगितले की, माणसाने आयुष्यात दोन तरी झाडं लावायलाचं हवीत. कारण शेवटच्या श्वासांपर्यंत झाडांची सोबत असते. प्रवासादरम्यान ते आपली सायकल नेहमीसोबत ठेवतात. आजूबाजूचे गावकरी, शेतकरी, सरकारी कार्यालयात  लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करतात. 

संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी सुरू केली चक्क कोरोनाची पूजा, गंगास्नान करून दाखवला लाडवांचा नैवैद्य

आश्चर्य! जगात केवळ एकच व्यक्ती खरेदी करु शकणार ‘ही’ ढासू बाईक; काय आहे स्पेशल?

Web Title: Meet green man narpat singh rajpurohit who cycling 14 states to save environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.