शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

लढाई जगण्याची! विना जबड्याचा जन्माला आला हा मुलगा, व्यंगावर मात देत आज बनला आहे मोठा स्टार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 3:50 PM

अकोस्टा ३१ ऑक्टोबर १९९९ ला अमेरिकेच्या एरिझोनामध्ये जन्माला आला होता. तो वेळेच्या आधीच जन्माला आला होता.

या मुलाचं नाव आहे यशायाह अकोस्टा(Isaiah Acosta). त्याची कहाणी ऐकून तुमचाही जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. कारण यशायाह जेव्हा जन्माला आला त्याला तोंडच नव्हतं. अकोस्टा ३१ ऑक्टोबर १९९९ ला अमेरिकेच्या एरिझोनामध्ये जन्माला आला होता. तो वेळेच्या आधीच जन्माला आला होता. दोन महिने आधीच त्याचा जन्म झाला होता. जन्माला आल्यावर डॉक्टर तर असेही म्हणाले होते की, त्याची जगण्याची शक्यता कमी आहे. पण आज तो स्टार झाला आहे. 

तो केवळ जगलाच नाही तर मोठा स्टारही झाला आहे. त्याने डॉक्टरची भविष्यवाणी खोटी ठरवली. पण त्याला जॉ लाइन म्हणजे जबडा नाहीये. या आजाराला अग्न्याशिया म्हटलं जातं. ही फार अवघड स्थिती असते. यात एका किंवा दोन्ही जबडे नसतात.

त्याला खालचे जबडे आणि श्वसनपथ नाही. त्यामुळे त्याला श्वास घेता येत नाही आणि खाताही येत नाही. तो त्याच्या गळ्यात लावलेल्या एक श्वासनलिकेच्या माध्यमातून श्वास घेतो. तसेच त्याच्या पोटात एक ट्यूब लावली आहे ज्याच्या माध्यमातून तो खातो.

यशायाहचं बालपण सोपं नव्हतं. तरी सुद्धा त्याचे आई-वडील नेहमी त्याच्या पाठीशी उभे होते. श्वास घेण्यासाठी तो ज्या ट्यूबचा वापर करतो. ती दिवसातून कमीत कमी तीन वेळा स्वच्छ करावी लागते. दर आठवड्याला ती बदलावी लागते. त्याच्या आई-वडिलांनी त्याला नॉर्मल स्कूलमध्येच पाठवलं. कारण तो ऐकू शकत होता. समजू शकत होता. त्याने पदवीही मिळवली आहे.

People च्या वृत्तानुसार, तो इतर मुलांपेक्षा वेगळा दिसत होता. अनेकदा यावरून लोकांनी त्याची खिल्लीही उडवली आहे. गेल्या २० वर्षात त्याच्यावर अनेक सर्जरी झाल्या. त्यामुळे तो जास्तीत जास्त  हॉस्पिटलमध्ये राहिला आणि आपल्या जीवनाची लढाई लढत राहिला.

त्याच्यासमोर कृत्रिम जबडे लावण्याचा पर्याय होता. पण त्याने यासाठी नकार दिला. त्याला वाटतं की, याने केवळ त्याचा चेहरा ठीक होईल. त्याला आवाज मिळणार नाही. तो जसा दिसतो तसा तो आनंदी आहे. २०१६ मध्ये त्याने फीनिक्स चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलांच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्याने इथे लोकांना सांगितले की, त्याला एक रॅपर बनायचं आहे. बालपणापासूनच तो गाणी लिहितो.

२०१७ मध्ये तिचं पहिलं गाणं आलं. याचं टायटल 'ऑक्सीजन टू फ्लाय' होतं. यानंतर त्यानंतर 'हेट इज द वीक' हे गाणं लिहिलं. तो गाण्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतो. अमेरिकेतील या मुलाने हे दाखवून दिलं आहे की, तो हार मानणार नाहीये. 

टॅग्स :AmericaअमेरिकाInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल