42 मिनिटांपर्यंत धावले 96 वर्षांचे आजोबा; मोडित काढले सगळे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 11:43 AM2019-07-27T11:43:48+5:302019-07-27T11:50:27+5:30

आपल्याला वयाच्या चाळीशीतही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण हे 96 वर्षांचे आजोबा चक्क 42 मिनिटं धावले आणि ती शर्यत जिंकलेही...

Meet 96 year old man roy englert who created record in running | 42 मिनिटांपर्यंत धावले 96 वर्षांचे आजोबा; मोडित काढले सगळे रेकॉर्ड

42 मिनिटांपर्यंत धावले 96 वर्षांचे आजोबा; मोडित काढले सगळे रेकॉर्ड

Next

आपल्याला वयाच्या चाळीशीतही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा आजोबांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी वयाच्या 96व्या वर्षी चक्क 5 किलोमीटर अतंर धावून पार केलं आहे. एवढंच नाहीतर त्यांनी हे अंतर फक्त 42 मिनिटांमध्ये पार केलं आहे. आपण काही अंतर पायी चाललो तरिही एवड्या लवकर पोहचू शकत नाही. पण आजोबांनी हे अतंर धावून पार केलं आहे. 

रॉय एन्ग्लर्ट (Roy Englert) असं या आजोबांचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या USATF Masters Outdoor Championships मध्ये आजोबा सहभागी झाले होते. याच चॅम्पियनशिपमद्ये त्यांनी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. 

सतत रचत आहेत नवनवे रेकॉर्ड
 
रॉय एन्ग्लर्ट हे वर्जिनियामध्ये राहत आहेत. ते 95 ते 99 वयाच्या गटामध्ये 800 मीटर, 1500 मीटर आणि 3000 मीटरपर्यंत धावले आहेत. परंतु, 11 जुलै रोजी त्यांनी जणू काही इतिहासच रचला. आजोबांनी चक्क 5000 मीटर अंतर 42 मिनिटं 30 सेकंदांमध्ये पार केलं. 

तोडले सर्व रेकॉर्ड 

याआधी Frank Levine यांनी रेकॉर्ड केला होता. त्यांनी 5000 मीटर अंतर 50 मिनिटं 10 सेकंदांमध्ये पूर्ण केलं होतं. रॉय यांनी यांचा रेकॉर्ड मोडित काढत नवा विक्रम रचला.

एकट्यानेच पूर्ण केली शर्यत

आजोबांच्या वयोगटामध्ये त्यांना कॉम्पिटिसन देण्यासाठी जास्त लोकही नव्हते. म्हणजचे, ते एकटेच होते. शर्यत जिकल्यावर त्यांनी सांगितले की, मला धावताना फार गंमत वाटत होती. पण मी धावत होतो तेव्हा नाही तर जेव्हा मी माझी शर्यत पूर्ण केली. खरचं फार कठिण होतं माझ्यासाठी.' 

दरम्यान, आजोबा फक्त शर्यतीसाठीच नाहीतर दररोज धावण्याचा सराव करतात. ते दररोज 3 ते 4 किलोमीटर धावतात. ते म्हणतात की, त्यांना हळूहळू धावायला फार आवडतं. एवडचं नाहीतर अनेक लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतात. 

Web Title: Meet 96 year old man roy englert who created record in running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.