ऑफिसमधील महिलेशी प्रेमसंंबंध ठेवणं पडलं महागात, सीईओला कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 04:50 PM2019-11-04T16:50:05+5:302019-11-04T16:53:22+5:30

#MeToo अभियानानंतर अनेक मोठ्या कंपन्यांमधील मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांना कंपन्यांनी काढलं आहे.

Mcdonald's ousts ceo over consensual relationship with employee | ऑफिसमधील महिलेशी प्रेमसंंबंध ठेवणं पडलं महागात, सीईओला कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता!

ऑफिसमधील महिलेशी प्रेमसंंबंध ठेवणं पडलं महागात, सीईओला कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता!

googlenewsNext

(सांकेतिक फोटो)

ऑफिसमधीलच महिलेशी प्रेमाचं नातं ठेवणं एका बड्या कंपनीतील अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. मॅकडोनाल्ड कॉर्पने त्यांच्या सीईओला स्टीव्ह इस्टरब्रुकला पदावरून काढून टाकलंय. स्टीव्हीचं कंपनीतील एका महिला कर्मचारीसोबत अफेअर होतं. बोर्डाने निर्णय घेतलाकी, हे कंपनीच्या पॉलिसी विरोधात आहे आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ५२ वर्षीय इस्टरबुक २०१५ पासून कंपनीचे सीईओ होते.

बोर्डाने सांगितले की, कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशिप असल्याने त्यांच्याकडून काही चुकीचे निर्णय घेण्यात आलेत. स्टीव्हने सुद्धा बोर्डाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर इस्टरबुक म्हणाले की, 'मी चूक केली'. त्यांनी रविवारी कर्मचाऱ्यांना मेल पाठवला. त्यात लिहिले की, त्यांनी नेहमीच कंपनीला महत्व दिलं. पण बोर्डाचा निर्णय योग्य आणि आता ही त्यांची जाण्याची वेळ आहे. अमेरिकेतील कार्पोरेट विश्वातील अशा अनेक घटना समोर आल्या, ज्यात रिलेशनशिपमुळे मोठ्या अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागलाय.

सोशल मीडियावर चाललेल्या #MeToo कॅम्पेन दरम्यान मोठ्या कंपनींमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं. जून २०१८ मध्ये इंटेल कॉर्पचे सीईओ ब्रायनला पद सोडावं लागलं होतं. ते कंपनीतील महिला कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. आता क्रिस केंपिजिंस्कि यांनी मॅकडोनाल्ड यूएसचे सीईओ करण्यात आलंय.

केंपजिंस्की यांनी आपल्या मेसेजमध्ये ईस्टरब्रुकला धन्यवाद दिले आहेत. ते म्हणाले की, ईस्टरब्रुकच्या कामाचा पुढे नेण्यासाठी ते काम करतील. मॅकडीचे चेअरमन एनरिक हर्नडिज ज्यूनिअर म्हणाले की, केंपिजिंस्की कंपनीच्या रणनीतिसाठी उपयोगी आहे. मॅकडीचं हेड ऑफिस शिकागोमध्ये आहे आणि नुकतेच या ऑफिसने ४० वर्षे पूर्ण केलीत.

Web Title: Mcdonald's ousts ceo over consensual relationship with employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.