(Image Credit : pink.parhlo.com) (सांकेतिक फोटो)
कोणत्याही तरूणीसाठी लग्न तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची घटना असते. मात्र, गुजरातच्या वडोदरामधील एका नव्या नवरीचं लग्न तिच्यासाठी एक भितीदायक स्वप्नसारखं बनून समोर आलं. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नाची पहिली रात्रही तेवढीच महत्वाची आणि सुखी संसाराची स्वप्ने रंगवण्याची असते. पण या मुलीसाठी ही मधुचंद्राची रात्र काळरात्र ठरली. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीने तिला अश्लील व्हिडीओ दाखवले आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नाच्या काही दिवसातच वडोदराच्या पंचमहलमध्ये राहणाऱ्या या नववधूची सहनशक्ती संपली आणि तिने थेट पोलिसात जाऊन पतीविरोधात तक्रार दिली. नववधूने आरोप लावला आहे की, पतीने लग्नाच्या पहिल्या रात्री मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ दाखवले आणि नंतर अनैसर्गिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेऊन चौकशी सुरू केली आहे.
या महिलेने तक्रारीत सांगितले की, १३ डिसेंबरला तिचं तिच्या घरच्यांच्या पसंतीने लग्न झालं होतं. लग्नानंतर लगेच १४ डिसेंबरला सकाळीच आम्ही दोघं हॉटेल सर्वोत्तममध्ये गेलो. इथे पतीने तिला मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडीओ दाखवले आणि अनैसर्गिक संबंध ठेवण्याची मागणी केली.
हलोल पोलिसांनी सांगितले की, लग्नानंतर लगेच नवविवाहित जोडपं पहाटे २ वाजून ३० मिनिटांनी हॉटेलमध्ये गेलं. काही तासांनंतर हे जोडपं हॉटेलमधून निघून गेलं. नंतर कपलने या घटनेबाबत आपल्या परिवाराला सांगितले. ते म्हणाले की, लग्नाआधी दोघेही एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून ओळखत होते. आता या जोडप्याला घटस्फोट हवा आहे.