प्यार का बंधन! प्रेयसीच्या मृतदेहाला घातलं मंगळसूत्र, घेतली शपथ अन्...; 'या' लग्नाची तुफान चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:23 IST2022-11-21T17:10:56+5:302022-11-21T17:23:16+5:30
प्रियकराने आपल्या प्रेयसीशी अंत्यसंस्कारावेळी लग्न केलं आहे. यासोबतच त्याने आयुष्यभर अविवाहित राहण्याची शपथ घेतली.

प्यार का बंधन! प्रेयसीच्या मृतदेहाला घातलं मंगळसूत्र, घेतली शपथ अन्...; 'या' लग्नाची तुफान चर्चा
प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांचे भन्नाट किस्से हे सतत समोर येत असतात. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. आसाममध्ये अजब प्रेमाची गजब घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीवरील प्रेमाखातर असं काही केलं आहे जे ऐकून सगळेच भावूक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील गुवाहाटी येथील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी एका तरुणीचा आजारपणामुळे मृत्यू झाला.
प्रियकराने आपल्या प्रेयसीशी अंत्यसंस्कारावेळी लग्न केलं आहे. यासोबतच त्याने आयुष्यभर अविवाहित राहण्याची शपथ घेतली. आपल्या प्रेयसीची वधू होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बिटुपन तमुलीने तिच्या मृत्यूनंतरही तिच्याशी लग्न केलं. मोरीगाव येथील बिटुपन तामुली नावाच्या तरुणाने चापरमुख येथील कोसुआ गावातील 24 वर्षीय मृत प्रार्थना बोरा हिच्या गालावर आणि कपाळावर सिंदूर लावलं.
तरुणाने तिच्या गळ्यात माळ घातली. त्यानंतर तरुणाने दुसरी माळा स्वतः आपल्या गळ्यात घातली आणि लग्नाच्या विधी पूर्ण केल्य़ा. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मोरीगावचा रहिवासी बिटुपन आणि चापरमुख येथील कोसुआ गावात राहणारी प्रार्थना बोरा हे दोघे अनेक दिवसांपासून प्रेमात होते. दोघांच्याही घरच्यांना नात्याची माहिती होती.
प्रार्थना काही दिवसांपूर्वी अचानक आजारी पडली आणि तिला गुवाहाटी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. खूप प्रयत्न करूनही तिला वाचवू शकलो नाही. शुक्रवारी रात्री तिचे निधन झालं असं नातेवाईकांनी सांगितलँ. तसेच कोणी एवढं प्रेम कसं करू शकतं असा अनेकांना प्रश्न पडला आहे. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.