शरीर संबंधांसाठी 'तो' तब्बल ५६३ किमी चालत गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:36 IST2019-10-16T15:34:13+5:302019-10-16T15:36:01+5:30
मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून वाढवली मुलीशी ओळख

शरीर संबंधांसाठी 'तो' तब्बल ५६३ किमी चालत गेला अन्...
इंडियाना: एका अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी एक व्यक्ती तब्बल ५६३ किलोमीटर चालत गेला. मात्र तिथे गेल्यानंतर त्याला जोरदार धक्का बसला. अमेरिकेतील इंडियानात हा प्रकार घडला.
इंडियानातील व्हाईटटाऊनमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षांच्या टॉमी ली जेन्किन्सची इन्स्टंट मेसेजिंग ऍपवरुन १४ वर्षांच्या कायलीशी ओळख झाली. त्यानंतर ली सतत कायलीशी चॅट करत होता. हळूहळू लीनं ओळख वाढवली आणि तो कायलीला कामेच्छा वाढवणारे मेसेज करू लागला. कायलीनंदेखील मेसेजला रिप्लाय दिले. त्यामुळे लीनं तिच्याकडे भेटायची इच्छा व्यक्त केली. मात्र आपण अतिशय दूर राहत असल्यानं भेटणं शक्य नसल्याचं तिनं ली याला सांगितलं.
कायली विसकॉन्सिन भागात राहत असल्याची माहिती लीकडे होती. त्यामुळे त्यानं तिला भेटायची योजना आखली. त्यासाठी तो तब्बल ३५० मैल (५६३ किमी) चालत गेला. कायलीच्या घराच्या दिशेनं चालत असताना ली सतत तिच्याशी मेसेजच्या माध्यमातून बोलत होता. यावेळीही तो तिला उत्तेजना वाढवणारे मेसेज करत होता. आपण नेमके कुठे आहोत, याची माहितीदेखील तो मेसेज करून कायलीला देत होता.
तब्बल ५६३ किलोमीटर अंतर चालून कायलीच्या घरी पोहोचलेल्या टॉमी ली जेन्किन्सला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर आपण ज्या मुलीशी बोलत होतो, ती व्यक्ती पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती ली याला मिळाली. इंडियानासह काही भागात अल्पवयीन मुलींना सोशल मीडिया, मेसेजिंग ऍपच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढळणाऱ्यांचं प्रमाण अतिशय मोठं आहे. त्यामुळे पोलिसांनी काही खोटी प्रोफाईल तयार करून अशा व्यक्तींना अटक करण्यास सुरुवात केली आहे.