छत्तीसगडमधल्या बिलासपूरमधल्या या पतीनं बायकोसाठी चक्क चोरल्या डिझायनर साड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 16:51 IST2017-08-02T13:52:17+5:302017-08-21T16:51:46+5:30

बिसापूरमध्ये एका पतीने त्याच्या पत्नीसाठी चक्क साड्यांच्या दुकानात डल्ला मारला.

Man Steals Designer Sarees For Wife | छत्तीसगडमधल्या बिलासपूरमधल्या या पतीनं बायकोसाठी चक्क चोरल्या डिझायनर साड्या

छत्तीसगडमधल्या बिलासपूरमधल्या या पतीनं बायकोसाठी चक्क चोरल्या डिझायनर साड्या

ठळक मुद्देबिसापूरमध्ये एका पतीने त्याच्या पत्नीसाठी चक्क साड्यांच्या दुकानात डल्ला मारला. साड्यांच्या दुकानात चोरी करणारा तो व्यक्तीचं श्रीकांत गुप्ता असं नाव असून तो व्यवसायाने शिक्षक आहेश्रीकांत यांने चोरलेल्या दोन डिझायनर साड्यांची किंमत 56 हजार रूपये आहे

बिलासपूर, दि. 2- प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं बोललं जातं. प्रेमामध्ये अनेक चुकांना माफी मिळते, असंही सांगितलं जातं. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीसाठी काहीही करायला त्या व्यक्तीचा साथीदार तयार असतो. याचं उत्तम उदाहरण छत्तीसगडमधील बिसापूरमध्ये पाहायला मिळालं. तिथे राहणाऱ्या एका पतीने त्याच्या पत्नीसाठी चक्क साड्यांच्या दुकानात डल्ला मारला.

साड्यांच्या दुकानात चोरी करणारा तो व्यक्तीचं श्रीकांत गुप्ता असं नाव असून तो व्यवसायाने शिक्षक आहे. श्रीकांत गुप्ता यांची पत्नी प्रमिला गुप्ता एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली होती. बिसपूरमध्ये दरवर्षी ‘सावन सुंदरी’ नावाची सौंदर्य स्पर्धा भरते. या स्पर्धेत हजारो महिला सहभागी होतात. ही स्पर्धा जिंकणं हे अनेक महिलांचं स्वप्न असतं. या स्पर्धेत आपल्या पत्नीला कोणताही कमीपणा वाटू नये, म्हणून श्रीकांत यांनी मॉलमधून दोन डिझायनर साड्या चोरून पत्नीला भेट दिल्या. श्रीकांत यांने चोरलेल्या दोन डिझायनर साड्यांची किंमत 56 हजार रूपये आहे. त्या साड्या घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने श्रीकांतने साड्या चोरल्याची माहिती मिळते आहे. 

‘सावन सुंदरी’ स्पर्धेत अनेक महिला महागड्या साड्या नेसून येतात, त्यावेळी त्या स्पर्धेतील स्पर्धकांसमोर पत्नीला कमीपणा येऊ नये, तसंच तिच्यासाठी महागड्या साड्या खरेदी करण्याची आपली ऐपत नाही, म्हणून डिझायनर साड्या चोरल्याची कबूली श्रीकांत गुप्ता याने दिली आहे.  ‘सावन सुंदरी’ या स्पर्धेसाठी आलेल्या एका प्रेक्षकांने प्रमिलाने नेसलेली साडी पाहिली. दुकानातून चोरी झालेली ही तिच साडी असल्याचं त्यानं मालकाला लक्षात आणून दिलं होतं. पोलिसांनी साडी चोरली म्हणून श्रीकांतला अटक केल्याचं हिंदुस्थान टाइम्सने म्हंटलं आहे.
 

Web Title: Man Steals Designer Sarees For Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.