२८ बोटं असलेल्या देवेंद्रचं गिनीज बुकमध्ये नाव, मात्र जगण्याचा संघर्ष सुरूच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 13:56 IST2019-05-09T13:49:30+5:302019-05-09T13:56:59+5:30
अनेकदा सामान्यांपेक्षा अधिक बोटं असणाऱ्या व्यक्तींबाबत ऐकायला, वाचायला मिळत असतं. भारतात एक अशीच व्यक्ती आहे ज्याला हात आणि पायांना ७-७ बोटे आहेत.

२८ बोटं असलेल्या देवेंद्रचं गिनीज बुकमध्ये नाव, मात्र जगण्याचा संघर्ष सुरूच!
(Image Credit : Daily Mail)
अनेकदा सामान्यांपेक्षा अधिक बोटं असणाऱ्या व्यक्तींबाबत ऐकायला, वाचायला मिळत असतं. भारतात एक अशीच व्यक्ती आहे ज्याला हात आणि पायांना ७-७ बोटे आहेत. देवेंद्र सूथर असं या व्यक्तीचं नाव असून यासाठी त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. देवेंद्र जगातला असा एकुलता एक आहे. त्याला मॅक्सिमम फिंगर्स मॅन असं म्हटलं जातं. गुजरातच्या हिंमतनगरमध्ये राहणाऱ्या देवेंद्रला जन्मापासूनच पॉलीडॅक्टली नावाचा आजार आहे. पण याचं त्याला अजिबात दु:खं नाही. तो म्हणतो की, तो याने परेशान आहे, पण निराश नाही.
एक हजारात असतो असा एक व्यक्ती
देवेंद्रला २८ बोटे आहेत. गर्भात ७व्या किंवा ८व्या महिन्यात भ्रूणात जास्त बोटे विकसित होतात. एका आकडेवारीनुसार, जगभरात ७०० ते १००० मध्ये अशी एक केस असते. पण प्रेग्नेंसी दरम्यान अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून याची माहिती मिळवता येते. बॉस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलनुसार, विकसित देशांमध्ये अशा केसेस समोर आल्यावर आणि बाळ दोन महिन्यांचं झाल्यावर सर्जरीच्या माध्यमातून त्यांची अधिकची बोटे काढली जातात. अशा स्थितीतही देवेंद्र निराश नाही. त्याला दोन अपत्ये आहेत आणि तो कापरेंटरचं काम करतो. तो सांगतो त्याला शूज घेताना फार अडचण होते.
२०१० मध्ये गिनीज बुकमध्ये नाव
अशीच एक केस भारतात अक्षतमध्ये बघण्यात आली होती. त्याच्याही हाता-पायांना ७-७ बोटे होती. आणि २०१० मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं नाव नोंदवण्यात आलं होतं. पण नंतर सर्जरी करून त्याची बोटे काढण्यात आली होती. त्यामुळे सध्या हा रेकॉर्ड देवेंद्रच्या नावावर आहे.
आर्थिक तंगीमुळे सर्जरी टाळली
देवेंद्रला गिनीज बुकमध्ये नाव गेल्याने जगभरात प्रसिद्धी तर मिळाली, पण त्याला काही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळेच तो सर्जरी करू शकला नाही. आता वाढत्या वयानुसार त्याची बोटे आणखी कठोर होत आहेत. त्यामुळे त्याला काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.