शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

बोंबला! दोन कुत्र्यांच्या नावामुळे मालकाला १० दिवस तुरूंगवासाची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 4:06 PM

कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. अनेकदा तर कुत्रे मनुष्यांपेक्षाही चांगले ठरतात. पण इथे कुत्रे प्रामाणिक असण्याची विषय नाहीये.

कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. अनेकदा तर कुत्रे मनुष्यांपेक्षाही चांगले ठरतात. पण इथे कुत्रे प्रामाणिक असण्याची विषय नाहीये. बातमी अशी आहे की, एका व्यक्तीला त्याच्या कुत्र्यांच्या नावामुळे १० दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. असे सांगितले जात आहे की, या व्यक्तीने त्याच्या कुत्र्यांची नावं चीन सरकार आणि सरकारच्या सिव्हिल सर्व्हिस अधिकाऱ्यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. याचीच त्याला शिक्षा मिळाली आहे. 

चीनमध्ये राहणाऱ्या या ३० वर्षीय व्यक्तीचं नाव बेन आहे. गेल्या सोमवारी त्याला पोलिसांना नोटीस पाठवली होती. बेनने सोशल मीडिया नेटवर्क व्ही चॅटवर पोस्ट शेअर केली होती. यात त्याने सांगितले होते की, त्याने त्यांच्या कुत्र्यांची नावे Chengguan आणि Xieguan अशी ठेवली आहेत. यातील पहिलं नाव हे छोटे-मोठे गुन्हे निपटवणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. तर दुसरं सिव्हिल सर्व्हिसमध्ये ट्रॅफिक असिस्टंट म्हणूण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. चीनमध्ये अशी नावे कायद्याने अवैध मानली जातात. 

बेन ने सांगितले की, 'मला माहिती नव्हतं की, हे नावे अवैध आहेत. मला या नावांमध्ये ह्यूमर दिसला होता. त्यामुळे मी कुत्र्यांची ही नावे ठेवली. पण पोलिसांना यात काही ह्यूमर दिसला नाही आणि त्यांनी कारवाई केली'.

बिजिंग न्यूजसोबत बोलताना एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'डॉग ब्रिडरची पोस्ट सोशल मीडियात लोकांना भडकवणारी होती आणि याने देशाच्या-शहराच्या व्यवस्थेसाठी नुकसानकारक होतं. त्यामुळे आम्ही त्याच्यावर कारवाई केली'.

बेन याला आता १० दिवसाच्या तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे ही बातमी समोर आल्यावर सोशल मीडियातून लोकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलंय. लोकांचं म्हणणं आहे की, अशाप्रकारचे नियम कशाप्रकारेही ठरवले जाऊ शकत नाही.  

टॅग्स :chinaचीनdogकुत्रा