Video : कुरिअरने आलेला बॉक्स उघडून पाहिला तर आतून निघाला ५.५ फुटाचा कोब्रा आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 14:09 IST2019-08-28T14:08:26+5:302019-08-28T14:09:43+5:30

जरा विचार करा की, तुम्ही कुरिअरने काही वस्तू ऑर्डर केली असेल आणि आलेलं पार्सल उघडताच त्यातून भलामोठा कोब्रा साप निघतो, तर काय वाटेल?

Man gets shocked to find deadly cobra in courier parcel | Video : कुरिअरने आलेला बॉक्स उघडून पाहिला तर आतून निघाला ५.५ फुटाचा कोब्रा आणि...

Video : कुरिअरने आलेला बॉक्स उघडून पाहिला तर आतून निघाला ५.५ फुटाचा कोब्रा आणि...

जरा विचार करा की, तुम्ही कुरिअरने काही वस्तू ऑर्डर केली असेल आणि आलेलं पार्सल उघडताच त्यातून भलामोठा कोब्रा साप निघतो, तर काय वाटेल? अशीच एक घटना ओडिशा येथील मयूरभंजमध्ये घडली आहे. इथे एका व्यक्तीने काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या. पण जेव्हा बॉक्स उघडला गेला तेव्हा त्यातून ५.५ फूट लांब कोब्रा बाहेर आला.

ANI च्या रिपोर्टनुसार, मयूरभंजच्या रेरंगपूर येथील मृत्यु कुमारने विजयवाडा येथून काही किराणा माल ऑर्डर केला होता. या वस्तू कुरिअरने येणार होतं. सोमवारी जेव्हा मृत्यू कुमारला पार्सल मिळालं तेव्हा सगळं साहित्य व्यवस्थित मिळाल्याने तो आनंदी होता. पण बॉक्स उघडल्यावर पुढे काय होणार याचा जराही अंदाज त्याला नव्हता. 

मृत्यू कुमारने जसा बॉक्स उघडला तर आतून ५.५ फूट लांब कोब्रा बाहेर आला. इतका मोठा साप पाहून कुटूंबातील लोक घाबरले आणि एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, पार्सल जेव्हा कुरिअर ऑफिसमध्ये ठेवण्यात आलं होतं, तेव्हा उंदराने त्याला एक छिद्र पाडलं होतं. जेव्हा पार्सल गाडीने डिलेव्हरीसाठी बाहेर पाठवलं गेलं तेव्हाच एक साप त्या छिद्रातून बॉक्समध्ये गेला.

अशात लगेच मृत्यू कुमारने पार्सलमधून साप निघण्याची माहिती मयूरभंज वन विभागाला दिली. वन विभागाच्या लोकांनी साप पकडून त्याला जंगलात सोडून दिलं.

Web Title: Man gets shocked to find deadly cobra in courier parcel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.