हॉटेलमध्ये जेवताना 'हा' माणूस झाला मालामाल, दाताखाली आला लाखोंचा मोती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 04:47 PM2018-12-18T16:47:03+5:302018-12-18T16:49:43+5:30

एखाद्या व्यक्तीच नशीब जेवता जेवता कधी कसं पलटू शकतं याचा कुणी विचारही केला नसेल. पण जेवतानाही कुणाचा फायदा होऊ शकतो, याचं एक अजिब उदाहरण समोर आलं आहे.

Man finds pearl worth 2.8 lakh in an oyster dish new york city restaurant | हॉटेलमध्ये जेवताना 'हा' माणूस झाला मालामाल, दाताखाली आला लाखोंचा मोती!

हॉटेलमध्ये जेवताना 'हा' माणूस झाला मालामाल, दाताखाली आला लाखोंचा मोती!

Next

एखाद्या व्यक्तीचं नशीब जेवता जेवता कधी कसं पालटू शकतं याचा कुणी विचारही केला नसेल. पण जेवतानाही कुणाचा फायदा होऊ शकतो, याचं एक अजिब उदाहरण समोर आलं आहे. ही घटना अमेरिकेतील आहे. न्यू यॉर्कमधील Oyster Bar मध्ये एक व्यक्ती जेवण करत होता. खाता खाता त्याला अचानक काहीतरी वेगळं लागलं. त्याने ते बाहेर काढलं तर कळालं तो मोती आहे. तोही साधारण नाही तर महागडा. Oyster Bar इथे केवळ शिंपल्यापासून तयार केलेलेच पदार्थ मिळतात. 

६६ वर्षीय रिक अॅंटोश मित्रांसोबत जेवण करत होते. अचानक एक घास घेतल्यावर त्यांना तोंडात काहीतरी खड्यासारखं लागलं. हा व्यक्ती उठून बार मॅनेजरजवळ गेला. त्याने मॅनेजरकडे तक्रार केली. मॅनेजरने माफी मागितली आणि असं याआधी कधी झालं नाही असंही तो म्हणाला. 

रिकने तो मोती सांभाळून ठेवला. नंतर त्यांनी या मोत्याच्या किंमतीची माहिती काढली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण या मोत्याची किंमत २ हजार डॉलर ते ४ हजार डॉलर इतकी होती, असा अंदाज होता. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत १.५० लाख ते २.८४ लाख इतकी होते. रिकने याबाबत एक व्हिडीओ मुलाखतही दिली आहे. रिकने हा मोती अजूनही आपल्याजवळ सांभाळून ठेवला आहे.  

Web Title: Man finds pearl worth 2.8 lakh in an oyster dish new york city restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.