मुलीच्या जेवणामुळे पतीने पत्नीला दिला घटस्फोट, कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 09:37 AM2023-09-28T09:37:02+5:302023-09-28T09:38:43+5:30

रेडिटवर एका व्यक्तीने सांगितलं की, कसं जेवणामुळे त्याचं लग्न मोडलं. त्याने सांगितलं की, त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला एक 16 वर्षांची मुलगी आहे.

Man divorces wife after she not cooked according to his picky eater daughter reddit | मुलीच्या जेवणामुळे पतीने पत्नीला दिला घटस्फोट, कारण वाचून व्हाल अवाक्...

मुलीच्या जेवणामुळे पतीने पत्नीला दिला घटस्फोट, कारण वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

जगभरात असे बरेच लोक असतात ज्यांचे खाण्याबाबत फारच नखरे असतात. म्हणजे त्यांना काही मोजक्याच गोष्टी आवडतात. ते त्यांच्या जेवणाबाबत अजिबात अॅडजेस्ट करत नाहीत. अशा लोकांच्या परिवारातील लोकही त्यांच्या या सवयीची काळजी घेतात आणि त्यांना आवडेल तेच बनवतात. अनेकदा तर जेवणावरून भांडणही होतात.

रेडिटवर एका व्यक्तीने सांगितलं की, कसं जेवणामुळे त्याचं लग्न मोडलं. त्याने सांगितलं की, त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला एक 16 वर्षांची मुलगी आहे. जेव्हा ती 10 वर्षांची होती तेव्हा त्याने पहिल्या पत्नीला सोडून दुसरं लग्न केलं आणि सोबत राहू लागले. 

त्याने पुढे सांगितलं की, माझी मुलगी खाण्याबाबत फारच चूझी आहे. जसे की, ती ओटमील, टोमॅटो, लसूण आणि मशरूमसारख्या गोष्टी अजिबात खात नाही. तिला मसालेदार आणि गोड पदार्थ आवडतात. तिला जर लपून यातील काहीही खायला दिलं तर तिला राग येतो. 

त्याने लिहिलं की, एक दिवस तो घरी आला आणि त्याला दिसलं की, परिवारातील लोकांनी जेवण केलं आहे. एक प्लेटमध्ये त्याच्यासाठी जेवण काढून ठेवलं होतं. ज्यात त्या सगळ्यात गोष्टी होत्या ज्या त्याच्या मुलीला आवडत नाही. जेव्हा त्याने पत्नीला विचारलं की, मुलीने जेवण केलं का? तेव्हा तिने सांगितलं की, मुलीने दुपारपासून काहीच खाल्लेलं नाही. तेव्हा तो पत्नीवर रागावला. अशात पत्नी सुद्धा भडकली आणि म्हणाली की, तुझ्या मुलीचे खाण्याचे खूप नखरे आहेत. जेव्हा तिला भूक लागेल तेव्हा ती खाईल.

त्याने पुढे सांगितलं की, मी सगळं समजून घेतल्यानंतर मुलीला रेस्टॉंरंटमध्ये घेऊन गेलो आणि तिथे तिला जेवण दिलं. माझ्या लक्षात आलं की, माझी पत्नी खाण्याच्या अशाच गोष्टी आणत होती ज्या माझ्या मुलीला पसंत नाहीत. मला हेही समजलं की, इतक्या दिवसात माझ्या मुलीने माझ्याकडे तक्रार करण्याऐवजी स्वत: बाहेरून जेवण करून येत होती. 

त्याने पुढे लिहिलं की, जेव्हा ते रेस्टॉरंटमधून परत आले तेव्हा या गोष्टीवरून पत्नीसोबत वाद झाला. मी म्हणालो की, तुला माझ्या मुलीसोबत काय समस्या आहे. यावर ती गप्प राहिली आणि स्पष्ट सांगितलं की, मी तुला घटस्फोट देत आहे. तू तुझ्यासाठी वकील शोध. व्यक्तीच्या या पोस्टवर लोकांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. कुणी म्हणालं तू अगदी बरोबर केलं. तर काही म्हणाले की, तुझ्या मुलीला खाण्याचे इतके नखरे करण्याऐवजी स्वत: जेवण बनवता आलं पाहिजे.

Web Title: Man divorces wife after she not cooked according to his picky eater daughter reddit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.