शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

बोंबला! पैसे-दागिने नाही तर फक्त चोरायचा महिलांच्या वापरलेल्या चपला; कारण वाचून पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:20 IST

या चोराने ज्या वस्तू चोरल्या त्या पाहून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर चोरानं जे कारण सांगितलं त्यानं पोलिसही थक्क झाले.

चोर कधी कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. जपानमध्ये एका विकृत चोराला पकडण्यात आलं आहे. सामान्यपणे चोर पैशांची-दागिन्यांची चोरी करत असतात. पण हा चोर फारच विचित्र वस्तूंची चोरी करत होता. या चोराने ज्या वस्तू चोरल्या त्या पाहून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर चोरानं जे कारण सांगितलं त्यानं पोलिसही थक्क झाले.

जपानमधील (Japan) मुरकामी (Murakami) इथं राहणाऱ्या या चोराला पोलिसांनी १० जून रोजी महिलांच्या वापरलेल्या चपला आणि बूट चोरल्याबद्दल अटक केली होती. हा ४७ वर्षीय चोर एका ऑफिसमध्येही काम करायचा आणि संधी मिळताच महिलांनी वापरलेल्या चपला आणि बूट चोरून न्यायचा. पोलिसांना त्याच्या घरातून १३९ चप्पल आणि बुटाचे जोड सापडले आहेत. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं, तरूणाने विना कपडे १३व्या मजल्यावरून मारली उडी आणि...)

त्सुनेहिटो इसोबे असं या चोराचं नाव असून चप्पल आणि बूट चोरताना तो सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यानं चोरलेल्या सँडलची किंमत ५०० येन होती. मुराकामी भागातील कार्यालयामधून वारंवार महिलांची पादत्राणे गायब होत असल्यानं तिथं कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यात हा चोर दिसला.

आश्चर्याची बाब म्हणजे याआधीही या चोराला चपला चोरण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. तेव्हा त्याच्याकडे महिलांच्या पादत्राणाच्या २०० जोड्या सापडल्या होत्या. तुरुंगातून सुटल्यानंतर ७ वर्षाच्या आत त्यानं पुन्हा १३९ जोड्या चोरल्या होत्या. (हे पण वाचा : अरे देवा! टॉयलेट सीटवर बसताच सापाने व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला मारला दंश आणि मग.....)

काय होतं कारण?

यावेळी पोलिसांनी इसोबेची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, लहानपणापासूनच त्याला महिलांनी वापरलेल्या केलेल्या चप्पल, बुटांचं आकर्षण वाटत होतं. बर्‍याच वर्षांपासून तो महिलांनी वापरलेल्या पादत्राणांची चोरी करत आहे. कारण त्याला त्याचा वास आवडतो. या वासानं त्याला लैंगिक समाधान (Sexual Desires) मिळते. हा आनंद पुन्हा पुन्हा मिळवण्याच्या उद्देशानं तो वारंवार महिलांची पादत्राणे चोरत असे. 

टॅग्स :JapanजपानThiefचोरJara hatkeजरा हटके