रात्रीस खेळ चाले! रूमबाहेर थांबून कपल्सचे 'ते' आवाज ऐकणारा व्यक्ती हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 15:07 IST2019-11-06T15:03:50+5:302019-11-06T15:07:15+5:30
कपल्ससाठी फेमस असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ही व्यक्ती रोज रात्री जात होती.

रात्रीस खेळ चाले! रूमबाहेर थांबून कपल्सचे 'ते' आवाज ऐकणारा व्यक्ती हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद!
हॉटेल्समध्ये ग्राहकांसोबत घडत असलेल्या अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना सतत समोर येत असतात. ग्राहकांच्या प्रायव्हसीबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अशीच एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
चीनमधील एका हॉटेलमधील हे सीसीटीव्ही फुटेज असून यात एक व्यक्ती हॉटेल रूमच्या दरवाजातून आत डोकवताना दिसत आहे. Mr He असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती अनेकदा हॉटेल्स रूममध्ये कपल्सच्या खाजगी क्षणांवेळी येणारे आवाज ऐकायचा. इतकेच नाही तर त्यांचे इंटिमेट होतानाचे आवाज रेकॉर्डही करतो. हे सगळं करत असताना तो सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाला आहे.
एका कपलने या व्यक्तीची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि त्याला अटक केली. त्याने हे मान्य केलं की, तो अनेकदा हॉटेलमध्ये थांबतो आणि दरवाजाजवळ थांबून कपल्सचे रात्रीचे प्रणय करतानाचे आवाज ऐकतो आणि रेकॉर्ड करतो. असं करून तो त्याची शारीरिक आणि मानसिक गरज भागवतो असेही तो बोलला. त्याला याची सवय झाली होती असंही त्याने सांगितले.
या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याला पाच दिवसांची तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे आणि पुन्हा असं न करण्याचा समजही देण्यात आला आहे.