वाह रे नशीब! २१०० रूपयांचं स्केच घरी आणलं होतं, ते अब्जो रूपयांना विकलं गेलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 03:06 PM2021-11-26T15:06:34+5:302021-11-26T15:08:43+5:30

अब्जाधीश होण्याची संधी एका व्यक्तीला मिळाली. महत्वाची बाब म्हणजे त्याला लॉटरी नाही लागली  तर हे  शक्य झालं त्याच्या नजरेमुळे. 

Man buys drawing for 2100 rupees but it turns out to be worth 300 crores | वाह रे नशीब! २१०० रूपयांचं स्केच घरी आणलं होतं, ते अब्जो रूपयांना विकलं गेलं

वाह रे नशीब! २१०० रूपयांचं स्केच घरी आणलं होतं, ते अब्जो रूपयांना विकलं गेलं

Next

लोकांना खूप सारा पैसा कमावण्यासाठी कित्येक वर्ष  लागतात. पण काही लोकांचं नशीब इतकं जोरावर  असतं की ते नकळत काही वेळात अब्जाधीश होतात. अशीच अब्जाधीश होण्याची संधी एका व्यक्तीला मिळाली. महत्वाची बाब म्हणजे त्याला लॉटरी नाही लागली  तर हे  शक्य झालं त्याच्या नजरेमुळे. 

Mirror च्या रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने त्याचं नाव गोपनीय ठेवलं आहे. पण त्याने सांगितलं की, एका आई-बाळाचा फोटो त्याने असाच सेलमधून खरेदी केला होता. हे स्केच त्याला प्रसिद्ध आर्टवर्क रेप्लिकाचं वाटलं आणि त्याने केवळ २१०० रूपयांमध्ये हे स्केच खरेदी केलं. त्याला याची अजिबात जाणीव नव्हती की, त्याच्या  हातात जे पेंटिंग आहे ते फार जुनं आणि ओरिजीनल आहे. 

या व्यक्तीला नंतर समजलं की, तो जी पेंटिंग कमी किंमतीत घेऊन आला, ती पेंटिंग १५०३ मधील आहे. पिवळ्या रंगाच्या लेनिन कापडावर तयार केलेलं हे स्केच जगातील काही प्रसिद्ध मोनोग्राम्स एल्ब्रेट डुररच्या  मोनोग्राम्सपैकी एक आहे.  Smithsonian Magazine च्या रिपोर्टनुसार, हे पुनर्जागरण काळातील जर्मन आर्टिस्टचं आर्टवर्क आहे. या आर्टवर्कचा अभ्यास केल्यावर याची किंमत  $50 million म्हणजे भारतीय  करन्सीत ३,८४६,१५३,८४६ रूपये लावण्यात आली आहे.

अशाच प्रकारे २०१५ मधे ऑस्ट्रेलियातील डेविड होलला पिवळ्या रंगाचा जड दगड मेलबर्नजवळ सापडला होता.  ६ वर्षांनी ते त्याला एका म्युझिअममध्ये घेऊन गेले तर तो दगड अब्जो वर्ष जुना उल्कापिंड निघाला. ज्याची किंमतही अब्जो रूपये होती.
 

Web Title: Man buys drawing for 2100 rupees but it turns out to be worth 300 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.