बाबो! झोपेत पाणी समजून प्यायला वितळलेलं मेण आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 02:22 PM2021-08-09T14:22:05+5:302021-08-09T14:25:09+5:30

मिररमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ही व्यक्ती अर्ध्या रात्री झोपेतून उठली आणि चुकून वितळलेलं मेणबत्तीचं मेण प्यायलं. ज्यामुळे त्याच्या दातांवर मेण गोठलं.

Man accidentally drinks candle wax after mistaking it for water in UK | बाबो! झोपेत पाणी समजून प्यायला वितळलेलं मेण आणि मग....

बाबो! झोपेत पाणी समजून प्यायला वितळलेलं मेण आणि मग....

Next

यूनायटेड किंगडममधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने चुकून वितळलेल मेण(Man Drinks Candle Wax)  प्यायलं. व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत सांगितलं. 

मिररमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ही व्यक्ती अर्ध्या रात्री झोपेतून उठली आणि चुकून वितळलेलं मेणबत्तीचं मेण प्यायलं. ज्यामुळे त्याच्या दातांवर मेण गोठलं आणि त्याच्या तोंडाच्या वरच्या भागावरही मेणाचं कोटींग जमा झालं होतं.

काय झालं त्या दिवशी?

या व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या बेडजवळ एक स्टूल ठेवलेला होता. ज्यावर झोपताना तो रोज पाण्याचा ग्लास ठेवतो. त्या रात्री त्याच स्टूलवर पाण्याच्या ग्लाससोबत एक कॅंडलही ठेवलेली होती. ती कॅंडल काचेच्या ग्लासात होती. त्यामुळे तो जेव्हा झोपेत पाणी पिण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या हाती पाण्याच्या ग्लासऐवजी आणि कॅंडलचा ग्लास लागला. पाणी समजून तो वितळलेलं मेण प्यायला. (हे पण वाचा : एका जाहिरातीमुळे बदललं महिलेचं आयुष्य, समोर आलं पतीचं धक्कादायक सत्य)

तोंडात जमा झालं मेण

त्याने सांगितलं की, पहिल्यांदा त्याच्यासोबत इतकी अजब घटना घडली. भलेही तो या घटनेबाबत विचार करून हसतो की, त्याच्याकडून असा मूर्खपणा कसा झाला? कॅंडलचं वितळलेलं मेण पिताच व्यक्तीचं तोंड जळालं. नंतर त्याने लगेच मेण थुंकण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मेण त्याच्या तोंडात गोठलं होतं. त्याने सांगितलं की, जेव्हा त्याच्या तोंडात मेण गोठलं तेव्हा समजत नव्हतं की, काय करावं. कारण त्याने झोपेत मेण प्यायलं होतं.
 

Web Title: Man accidentally drinks candle wax after mistaking it for water in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.