महात्मा गांधीजींच्या चष्म्याची २.५५ कोटींना विक्री; नवीन मालक अमेरिकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:38 IST2020-08-23T03:20:32+5:302020-08-23T07:38:21+5:30
या चष्म्याला १०,००० पौंड ते १५,००० पौंड मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ऑनलाईन लिलावामध्ये बोली वाढत गेली व अखेर एवढी प्रचंड किंमत आली.

महात्मा गांधीजींच्या चष्म्याची २.५५ कोटींना विक्री; नवीन मालक अमेरिकन
लंडन : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या गोल्ड प्लेटेड चष्म्याची रेकॉर्डब्रेक २.५५ कोटी रुपयांना (२,६०,००० पौंड) विक्री झाली. ऐतिहासिक किमतीला विक्री झालेला हा चष्मा त्यांना १९००मध्ये भेट देण्यात आला होता, असे समजले जात आहे.
या चष्म्याला १०,००० पौंड ते १५,००० पौंड मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ऑनलाईन लिलावामध्ये बोली वाढत गेली व अखेर एवढी प्रचंड किंमत आली. ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्सचे बोली कर्ता अँडी स्टोव यांनी बोलीची प्रक्रिया संपवताना म्हटले आहे की, अश्विसनीय वस्तूची अविश्वसनीय किंमत आली आहे. या चष्म्याने लिलावात केवळ नवीन मापदंडच निर्माण केले नाहीत तर ऐतिहासिक रूपानेही ते महत्त्वपूर्ण ठरले आहेत. हा अद्भुत लिलाव होता, ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. चष्म्याच्या लिलावाबाबत भारत, कतार, अमेरिका, रशिया, कॅनडा या देशांतील बोलीदारांसह जगभरातील लोकांना उत्सुकता होती. चष्म्याचा नवीन मालक अमेरिकेतील रहिवासी आहे. चष्म्याच्या पूर्वीच्या मालकाने म्हटले आहे की, रक्कम तो आणि मुलगी विभागून घेणार आहेत. हा चष्मा ज्या अज्ञात व्यक्तीच्या कुटुंबाकडे होता, त्याला त्याच्या वडिलांनी सांगितले होते की, ते १९१० ते १९३० दरम्यान दक्षिण अफ्रिकेत ब्रिटीश पेट्रोलियममध्ये नोकरीस होते तेव्हा त्याच्या काकाने हा चष्मा भेट दिलेला होता.