शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

फक्त 1.50 रुपये खर्च अन् 50 किमीपर्यंत प्रवास, तामिळनाडूमधील विद्यार्थ्याने बनवली इलेक्ट्रिक सायकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 16:39 IST

electric cycle : पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी करण्याबरोबरच या सायकलच्या वापरामुळे प्रदूषणही कमी होईल. तसेच, ही सायकल सामान्य लोकांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

ठळक मुद्देया इलेक्ट्रिक सायकलने 50 किमीपर्यंत प्रवास करण्यासाठी 1.50 रुपये खर्च येतो. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 12 व्होल्टच्या 4 बॅटरी आहेत, 350 वॅटची ब्रश मोटर आहे, वेग वाढविण्यासाठी एक्सीलेटर बसविण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price) किंमती दररोज वेगाने वाढत आहेत. दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. देशातील बर्‍याच राज्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत शंभर पार केली आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक आता सार्वजनिक वाहतुकीचा (Public transport) प्रवास करणे चांगले समजत आहेत. कार,​दुचाकी आणि स्कूटर चालविणे लोकांसाठी तोट्याचा सौदा बनत चालला आहे. (college student in tamil nadu madurai designs solar powered electric cycle pictures viral on social media)

दरम्यान, तामिळनाडूमधील मदुराई कॉलेजमध्ये शिकणार्‍या धनुष कुमार या विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक सायकलचा शोध लावला आहे. ही सायकलची सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी करण्याबरोबरच या सायकलच्या वापरामुळे प्रदूषणही कमी होईल. तसेच, ही सायकल सामान्य लोकांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

लोकांसाठी फायदेशीरवृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, धनुष कुमार यांनी सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल शोधून काढली आहे. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 50 किमी धावण्याची क्षमता आहे. याचबरोबर, सायकलला इलेक्ट्रिक चार्ज डाऊनलाईन कमी झाल्यावरही सायकल 20 किमी आरामात चालवता येते. या सायकलमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि लोक त्यांच्या सोयीनुसार ती सहज वापरु शकतात.

काय आहे इलेक्ट्रिक सायकलची खासियत?या इलेक्ट्रिक सायकलने 50 किमीपर्यंत प्रवास करण्यासाठी 1.50 रुपये खर्च येतो. ही इलेक्ट्रिक सायकल 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 12 व्होल्टच्या 4 बॅटरी आहेत, 350 वॅटची ब्रश मोटर आहे, वेग वाढविण्यासाठी एक्सीलेटर बसविण्यात आला आहे. सोशल मीडियावर, मदुराई कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धनुष कुमारच्या या सायकलचे जोरदार कौतुक केले जात आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCyclingसायकलिंगJara hatkeजरा हटके