नवरी-नवरदेवाच्या कारच्या टायरची पोलिसांनी सोडली हवा, गाडी ढकलत घरी पोहोचलं कपल....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:11 AM2021-05-03T09:11:54+5:302021-05-03T09:14:05+5:30

दुसरीकडे त्याच रस्त्याहून जात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या गाडीवर काहीच कारवाई केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये हा नवरदेव त्याच्या नवरीला घरी घेऊन जात होता. 

Madhya Pradesh : Police puncher bride and groom car in Rewa | नवरी-नवरदेवाच्या कारच्या टायरची पोलिसांनी सोडली हवा, गाडी ढकलत घरी पोहोचलं कपल....

नवरी-नवरदेवाच्या कारच्या टायरची पोलिसांनी सोडली हवा, गाडी ढकलत घरी पोहोचलं कपल....

googlenewsNext

सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनामुले लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पोलीस नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करत आहेत. अशात मध्य प्रदेशमधून एक कारवाई घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील रीवामध्ये पोलिसांनी लग्नाहून परत येत असलेल्या नवरी-नवरदेवाच्या कारची हवा काढली. मात्र, दुसरीकडे त्याच रस्त्याहून जात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या गाडीवर काहीच कारवाई केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये हा नवरदेव त्याच्या नवरीला घरी घेऊन जात होता. 

लोकांनी बाहेर फिरू नये म्हणून जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अशात रीवातील मंडईजवळ पोलिसांनी लग्न करून आलेल्या नवरी-नवरदेवाच्या कारच्या टायरमधील हवा सोडली. मात्र, पोलिसांनी तेथून भाजपाचे झंडे लागले असलेल्या गाड्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. या गाड्या सोडून इतरही काही गाड्यांच्या टायरमधील पोलिसांनी हवा सोडली. त्यामुळे अनेक लोकांना अडचणींना सामना करावा लागला. हे नवविवाहित जोडपं गाडी ढकलत घरी पोहोचल्याचं समजतं.

पोलिसांच्या या कृत्याला सरकारकडून लग्नासाठी दिल्या गेलेल्या आदेशांचा अवमान मानलं जात आहे. दरम्यान याबाबत जेव्हा मीडियाने अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय डाबर यांच्याशी बातचीत केली तर ते म्हणाले की, कोविड गाइडलाईनचं पालन करतच ही कारवाई झाली.

कोरोना संक्रमण वाढत असल्याने मध्य प्रदेशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशात मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी लग्न समारंभांसाठी काही गाइडलाईन तयार केली आहे. ज्यात घरातच परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न करू शकता. मात्र, दुसरीकडे रीवामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा अपमान होताना दिसत आहे. पोलीस कर्मचारी मनमानी करताना दिसत आहेत.
 

Web Title: Madhya Pradesh : Police puncher bride and groom car in Rewa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.