शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 07:40 IST

सेऊलमध्ये शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी राहण्यासाठी या गोशिवॉनला पसंती देतात. शैक्षणिक सत्र सुरू झाल्या झाल्या येथील सर्व गोशिवॉन विद्यार्थ्यांनी भरून जातात. पण लिडिया मात्र याबाबतीत सुदैवी ठरली.

घर विकत घ्यायचं असो किंवा भाड्याने, ते घेताना जागा किती मोठी आहे, खोल्या प्रशस्त आहेत की नाही, आपलं सगळं सामान त्यात व्यवस्थित मावेल की नाही याची काळजी असते. मनासारखं घर परवडत नसलं की, माणसे नाखुशीने त्या जागेशी तडजोड करून राहतात. पण लिडिया रोका या २७ वर्षीय तरुणीला विचारा छोट्या घरात 'आनंदा'ने राहण्याचं सिक्रेट ! अवघ्या ७७ चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या लिडियाला तिचं घर कितीही छोटं असलं तरी मनापासून आवडतं. तिला तिची खोली म्हणजे जगातली सर्वात सुंदर जागा वाटते. कारण त्या इवल्याशा खोलीने तिच्या जीवनातला संघर्ष संपवला.

लिडियाने जर्मनीतील फ्रैंकफर्ट येथे शिकून पदवी मिळवली. पुढे बिझिनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी ती दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये आली. गेल्या अडीच वर्षांपासून ती इथे राहते. तिने सहावेळा घर बदललं. पण सहाव्या घराने तिला कसं जगायला हवं, याची दिशा दाखवली. लिडिया आत्ता जिथे राहते ती भाड्याची जागा आहे. ८ बाय ९ फुटांची छोटीशी खोलीच. दक्षिण कोरियात अशा छोट्या घरांना 'गोशिवॉन' म्हणतात. एक पलंग, एक छोटं टेबल, एक खुर्ची, मांडणी, छोटुसा फ्रीज आणि छोटं शौचालय एवढाच या गोशिवॉनचा आवाका. सेऊलमध्ये राहणाऱ्या लिडियासारख्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी ही जगण्यातला सुकून अनुभवण्याची जागा आहे.

या घरात राहायला येणं हे लिडियासाठी सोप्प नव्हतं. जागेच्या अभावामुळे लिडियाने आपल्याकडचं बरंच सामान अनिच्छेनेच काढलं. पण आत्ता मात्र कमीतकमी गोष्टींमध्ये आनंदाने जगणं ही लिडियाची जीवनशैली झाली आहे. लिडिया या घरात राहायला येण्यापूर्वी काही मिनिमलिस्ट विचारसरणीची नव्हती. पण आत्ता मात्र ती मिनिमलिझमच्या प्रेमात पडली आहे. आपल्या गरजा आणि हाव यातला फरक तिला कळू लागला आहे.

सेऊलमध्ये शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी राहण्यासाठी या गोशिवॉनला पसंती देतात. शैक्षणिक सत्र सुरू झाल्या झाल्या येथील सर्व गोशिवॉन विद्यार्थ्यांनी भरून जातात. पण लिडिया मात्र याबाबतीत सुदैवी ठरली. तिला सत्राच्या मध्यात येऊनही राहण्यासाठी गोशिवॉन मिळालं. ७२ चौरस फुटांच्या खोलीत राहण्यासाठी लिडियाने आपल्या गरजा अगदीच मर्यादित केल्या. कमीतकमी वस्तू तिच्या खोलीत सहज बसू शकल्या. आपल्याकडच्या अनेक वस्तू तिने गरजूंना देऊन टाकल्या. तेव्हा तिला समजलं की, आपण कितीतरी वस्तू नुसत्याच घेत राहतो. खरं तर आपल्याला जगण्यासाठी खूप नाही तर फारच मर्यादित गोष्टींची गरज असते. या जागेचं ३२८ डॉलर्स मासिक भाडं मोजणारी लिडिया गोशिवॉनमध्ये राहताना सामूहिक स्वयंपाकघर आणि सामूहिक कपडे धुण्याची जागा वापरते.

खोली छोटी असली तरी लिडियाला ती फारच आरामदायक आणि तिच्या गरजांना अनुरूप वाटते. घरी आलं की, तिला रेशीम किड्याच्या मऊ मऊ कोशात शिरल्यासारखं वाटतं. तिचा अख्खा दिवस कॉलेज, मग अर्धवेळ नोकरीत जातो. घरी ती फक्त झोपण्यासाठी आणि आरामासाठी येते. पण जेवढा वेळ ती तिच्या इवल्याशा खोलीत असते, खुश असते. गुलाबी, जांभळ्या रंगाने सजवलेल्या आपल्या खोलीत लिडिया तडजोड करून नाही तर आनंदाने राहते. या छोट्याशा जागेने तिची जगण्याकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी