शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

'या' श्रीमंत व्यक्तीला त्याच्या फार्महाउसवर मजा-मस्ती करण्यासाठी हवे आहेत मित्र, जाताय का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 12:50 IST

प्रत्येकाचीच आयुष्यात एकदा तरी परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते. तुम्हीही फिरण्याचे शौकीन असाल तर तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

(Image Credit : bongitravel.it)

प्रत्येकाचीच आयुष्यात एकदा तरी परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते. तुम्हीही फिरण्याचे शौकीन असाल तर तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जर्मनीच्या प्रसिद्ध बिझनेसमन  Karl Reipen तुमचं हे स्वप्न पूर्ण करू शकतात. 

कार्ल रिपन यांना १० अशा लोकांची गरज आहे जे न्यूझीलॅंडमध्ये त्यांच्या फार्महाऊसवर त्यांचा एकटेपणा दूर करू शकतील. यासाठी ते तुमच्याकडून काहीच पैसे घेणार नाही. फक्त तुम्हाला त्यांचे मित्र होऊन फार्महाउसवर मजा-मस्ती करायची आहे. या फार्महाउसवर तुम्हाला सर्वच आधुनिक सुविधाही मिळतील.

न्यूझीलॅंडच्या न्यू प्लेमाउथमध्ये असलेल्या २२० हेक्टरमध्ये पसरलेली Awakino Estate कार्ल रिपन यांनी २००० साली खरेदी केली होती. इथे सगळंच आहे. पण मित्र नाहीत. कार्ल यांना त्यांच्या या फार्महाउसवर मित्रांची कमतरता फार टोचते. त्यामुळेच त्यांनी ही शानदार ऑफर दिली आहे.

(Image Credit : thesun.co.uk)

कार्ल रिपन यांनी यासाठी एका लोकल वृत्तपत्रात जाहिरातही दिली आहे. त्यात लिहिले आहे की, १८ ते ७० वर्षाची कोणतीही व्यक्ती (महिला व पुरुष) माझ्या 'Awakino Estate' मध्ये सुट्टी घालवण्यासाठी येऊ शकते. एका व्हिलामध्ये दोन लोक शेअरिंग करू शकतात. जर तुमच्याकडे स्वत:चा घोडा असेल तर त्यालाही आणू शकता.

'Awakino Estate' जवळील अवेकिनो नदीमध्ये तुम्ही स्वीमिंग, फिशिंग, कायाकिंग, बर्ड वॉचिंगसोबतच नदी किनारी मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकही करू शकता. जर तुम्हाला वाइल्ड लाइफची आवड असेल तर इथे वेगवेगळ्या प्रकारची प्राणीही बघायला मिळू शकतात.

न्यूझीलॅंडच्या तस्मान समुद्राजवळ असलेल्या ८.५ मिलियन डॉलरच्या 'Awakino Estate' आत तुम्हाला राहण्यासाठी अनेक व्हिला आहेत. २०१६ मध्ये कार्ल यांनी हे प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी कुणी खरेदी करणारा मिळाला नाही. तुम्हाला जर इथे जायच असेल तुम्ही Karl Heinz Reipen Trust सोबत संपर्क करू शकता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल