शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

किचनमधील फरशीचं काम करत होतं कपल, सापडली 2 कोटी रूपयांची सोन्याची नाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 12:11 IST

Couple Found Gold Coin : कपल आता ही नाणी सव्वा लाख पाउंडला विकत आहेत. कपलला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की, ते ज्या घरात अनेक वर्षांपासून पाहत आहेत त्यांना तिथे खजिना मिळेल. 

Couple Find Gold Coins: यूनायटेड किंगडममधील एका कपलला घरातील काम करत असताना किचनच्या फरशीखाली सोन्याची नाणी सापडलीत. ही सोन्याची नाणी 400 वर्ष जुनी आहेत. 264 सोन्याच्या नाण्यांचं हे कलेक्शन 400 वर्षांपेक्षा अधिक जुनं आहे. हा खुलासा तेव्हा झाला जेव्हा ते उत्तर यॉर्कशायरमधील घरात काही काम करत होते. कपल आता ही नाणी सव्वा लाख पाउंडला विकत आहेत. कपलला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की, ते ज्या घरात अनेक वर्षांपासून पाहत आहेत त्यांना तिथे खजिना मिळेल. 

कपलला जराही अंदाज नव्हता की, किचनच्या फरशीखाली असं काही असेल. हे त्यांच्यासाठी फारच आश्चर्यकारक होतं. त्यांनी विचार केला होता की, त्यांच्या 18व्या शतकातील घरातील कॉंक्ट्रीटच्या जमिनीखालील विजेचे तार खराब झाले असतील. जसं त्यांनी घरातील फरशी रिनोवेट करणं सुरू केलं. तेव्हा त्यांना असं काही दिसलं ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. कदाचित नशीब चमकणं यालाच म्हणतात. त्यांना सोन्याची नाणी असलेलं एक भांड सापडलं.

जेव्हा तज्ज्ञांनी या वस्तूचं परिक्षण केलं तेव्हा त्यांना समजलं की, ते 2.3 कोटी रूपयांवर राहत आहत. 'द सन' ने सांगितलं की, ही नाणी 1610 ते 1727 दरम्यानचे आहेत. या काळात जेम्स फर्स्ट आमि चार्ल्स फर्स्ट यांचा शासनकाळ होता. या कपलने लगेच लंडनमधील लिलाव करणारी संस्था स्पिंक अॅन्ड सनला बोलवलं. तेव्हा ते हे कलेक्शन बघण्यासाठी त्यांच्या घरी गेले.

लिलावकर्ता ग्रेगरी एडमंडच्या हवाल्याने द सनने सांगितलं की, '260 नाण्यांचा हा शोध ब्रिटनच्या पुरातत्वाच्या रेकॉर्डवर सर्वात मोठ्या शोधांपैकी एक आहे. हा पूर्णपणे आश्चर्यकारक शोध होता. मालक त्यांच्या घरातील फरशी रिनोवेट करत होते. तेव्हा त्यांना एक भांड आढळलं. ज्यात सोन्याची नाणी भरली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLondonलंडन