समुद्रकिनारी सापडला 'हा' मासा ज्याला बघताक्षणी हातात घ्यावासा वाटेल, पण स्पर्श करताच होईल मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 11:46 AM2021-10-01T11:46:11+5:302021-10-01T11:46:29+5:30

विस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. नुकताच हा मासा ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसल्याचं वृत्त समोर आलं आहे.

lionfish found on Britain sea shore lionfish is poisonous fish | समुद्रकिनारी सापडला 'हा' मासा ज्याला बघताक्षणी हातात घ्यावासा वाटेल, पण स्पर्श करताच होईल मृत्यू

समुद्रकिनारी सापडला 'हा' मासा ज्याला बघताक्षणी हातात घ्यावासा वाटेल, पण स्पर्श करताच होईल मृत्यू

googlenewsNext

आपल्या पृथ्वीवर ७१ टक्के भागात पाणी आणि २९ टक्के भागात जमीन आहे. उपलब्ध असलेलं बहुतांश पाणी महासागर आणि समुद्रात आहे. ज्या प्रकारे जमिनीवर अनेक प्रजाती आहेत, त्याचप्रमाणे पाण्याखालीदेखील शेकडो प्रजाती आहेत. यामध्ये अनेक विषारी प्रजाती अस्तित्वात आहेत. काही जीव तर असे आहेत, ज्यांच्या केवळ एका दंशानेसुद्धा आपला जीव जाऊ शकतो. विस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. नुकताच हा मासा ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसल्याचं वृत्त समोर आलं आहे.

दिसायला अतिशय आकर्षक असलेल्या  या माशाचं नाव आहे लायनफिशचं. याचं वजन साधारण १.५ किलोपर्यंत असतं, तर लांबी ५ ते ४५ सेंटीमीटरच्या दरम्यान असते. त्याच्या पेक्टोरल फिन्सला (Pectoral Fins) विषारी काटे असतात, ज्यांचा डंख खूप विषारी आणि वेदनादायक असतो. लायनफिशने डंख केला तर तर व्यक्तीला तीव्र वेदना सुरू होतात. याशिवाय धाप लागून उलट्यांचादेखील त्रास सुरू होतो. याहीपेक्षा भीतिदायक म्हणजे हा मासा चावल्यामुळे अर्धांगवायू (Paralysis) होण्याची शक्यता असते. कधीकधी व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.

हा लायनफिश काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या किनाऱ्यावर आढळला. किनारी भागात लायनफिश आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हा मासा ज्या ठिकाणी आढळला तो भाग कायम पर्यटकांच्या गर्दीनं फुललेला असतो. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, ३९ वर्षांच्या अरफॉन समर्स नावाच्या व्यक्तीनं हा लायनफिश पकडला आहे. त्याची लांबी ६ इंच असून त्याच्या अंगावर १३ विषारी काटे आहेत.

लायनफिश प्रामुख्यानं दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean) आणि हिंदी महासागरात (Indian Ocean) आढळतात; मात्र सध्या भेडसावत असलेल्या जागतिक तापमानवाढीच्या समस्येमुळे आता भूमध्य समुद्रातही (Mediterranean Sea) त्यांचं वास्तव्य दिसतं. अरफॉननं पकडलेला मासा इटलीहून ब्रिटनमध्ये पोहोचला असावा, अशी शक्यता सागरी जीवशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हे मासे फक्त मानवासाठीच नाही, तर इतर सागरी जीवांसाठीदेखील हानिकारक आहेत. कारण, याचं वास्तव्य ज्या ठिकाणी असतं त्या भागातल्या इतर जीवांनादेखील ते हानी पोहचवतात.

Web Title: lionfish found on Britain sea shore lionfish is poisonous fish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.